प्रकल्पग्रस्तांना आणि भूमिपुत्रांना डावलुन भरती केल्याने भूमिपुत्र नाराज

हुतात्मा दिनाच्या दिवशी जेनपीटीच्या एनईझेडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून उपऱ्यांची भरती

उरण : फक्त प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनाच नोकरी,रोज़गार मिळावा याकरता 12 जानेवारी 2023 रोज़ी JNPT टाउनशिप येथे जागर मेळावा तर 13 जानेवारी रोज़ी लोकनेते दी.बा.पाटीलसाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने पनवेल येथे रोजगार मेळावा घेण्यात आला. स्थानिक बेरोजगार भूमीपुत्रांना सेझ व इतर प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळाले पाहिजेत. एकही स्थानिक भूमीपुत्र बेरोजगार राहता कामा नये यासाठी उरण मधील विविध सामाजिक संस्था, संघटना प्रयत्नशील आहेत. विविध सामाजिक कार्यकर्ते,सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नेते प्रयत्नशील आहेत. मात्र प्रयत्न करणाऱ्या या सर्वांना फाट्यावर मारुन JNPT च्या SEZ मध्ये दिनांक 16 जानेवारी 2023  रोज़ी म्हणजेच हुतात्मा दिनीच सुरक्षा रक्षक म्हणून उपऱ्यांची (परप्रांतीयांची )भरती करण्यात आलेली आहे.

ज्यांची सेझसाठी तसेच विविध प्रकल्पा करिता ज़मीन गेली त्यांना प्रथम मग त्या गावातून मग तालुक्यातून या क्रमाने ही भरती व्हायला पाहिजे होती मात्र तसे झाले नाही. प्रकल्पग्रस्तांना आणि भूमिपुत्रांना डावलुन ही भरती केली गेली.स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आणि भूमिपुत्रांना डावलुन ही भरती केली असल्याने  हुताम्यांचा अवमान झाला आहे.हुतात्मा दिनी परप्रांतीय तरुणांची उरण मध्ये नोकर भरती झाल्याने हुतात्म्यांचा अपमान तर झालाच आहे.शिवाय स्थानिक बेरोजगार तरुणांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.हुतात्मा दिनी हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्यांना विविध सामाजिक संस्था, संघटनानीं, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी योग्य तो धडा शिकवावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे. ही नोकर भरती कोण करत आहे याचीही चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी बेरोजगार स्थानिक तरुणांकडुन होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत ५६ फुटाची भव्य रांगोळी