महापे येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
नवी मुंबई -: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व वाहतूक विभागामार्फत नवी मुंबई शहरात ११ ते १७ जानेवारी २०२३ या असा वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी म्हणून वाहतूक शाखेमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि याचाच एक भाग म्हणून स्वयंसेवी संस्था व महापे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापे येथे १६ जानेवारी रोजी पोलीस वाहतूक कर्मचारी, वाहन चालक व रिक्षा चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने नेत्र तपासणी केली.