‘महावितरण'तर्फे वाशीमध्ये १२ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित
वाशीमध्ये १२ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित
नवी मुंबई ः वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातून प्रदुषणाचे दृष्टचक्र पर्यावरणभोवती आवळले जात आहे. वाहन निर्मित प्रदुषणाने अनेक शहरांमध्ये धोक्याची पटरी ओलांडली आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये विद्युतीकरणामध्ये रुपांतर केल्यास एका वाहनामागे अंदाजे ४.६ मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. केंद्र शासनाने नेशनल मोबिलिटी मिशन २०२० केले आहे. महाराष्ट्र शासनाने देखील इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता विचारात घेऊन आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक धोरण आणले आहेत.
या धोरणाला हातभार लावण्यासाठी ‘महावितरण'ने राज्यातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘महावितरण'च्या वाशी मंडळात १२ नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. सदर चार्जिंग स्टेशन वाशी येथील रघुलीला मॉल, सेक्टर-३० उपकेंद्र, वाशी रेल्वे स्थानक जवळ, सेक्टर-२ खारघर उपकेंद्र, सेक्टर-१९ई उपकेंद्र, पामबीच गॅलेरिया मॉल जवळ, पामबीच रोड, सेक्टर-१५ उपकेंद्र, एरोली उपकेंद्र, पावणे एमआयडीसी, सेक्टर-८ रबाले एमआयडीसी उपकेंद्र, इंदिरानगर उपकेंद्र, सेंट्रल रोड, ल्युब्रिझॉल कंपनी जवळ, तुर्भे नवी मुंबई, टपाल लाका उपकेंद्र, पनवेल-उरण रोड, टपाल नाका, पनवेल, सेक्टर-५० सीवुडस्, नवी मुंबई, सेक्टर-९ नेरुळ पामबीच उपकेंद्र, सेक्टर-१५ नेरुळ, सीबीडी उपकेंद्र, सीबीडी बेलापूर, पुढारी उपकेंद्र येथे उभारण्यात आली आहेत.
ग्राहकांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘महावितरण'चे झ्दैी ल्ज् ॲप इंस्टॉल करुन एमएसईडीसीएलचा (श्एिंण्थ्) पर्याय निवडावा. चार्जिंग स्टेशन ‘महावितरण'च्या मोबाईल ॲप वर शोधणे अतिशय सोपे आहे. सदर सर्व चार्जिंग स्टेशन रस्त्याच्या लगत असल्यामुळे ग्राहकांना वाहन परिमंडलाच्या आत मध्ये अथवा रस्त्यावर नेण्याची गरज नाही. चार्जिंग स्टेशनच्या प्रांगणात वाहनांच्या चाचणीसाठी सोय उपलब्ध आहे. दरम्यान, सदर कामाबद्दल ‘महावितरण'चे भांडूप परिमंडल मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वाशी मंडळातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
सदर चार्जिंग केंद्रावर एका किलो व्हॅटसाठी इतर चार्जिंग स्टेशन पेक्षा कमी दर आहेत. त्यामुळे ‘महावितरण'च्या वाशी मंडलातील ग्राहकांनी सदर चार्जिंग स्टेशनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजाराम माने, अधीक्षक अभियंता - वाशी मंडळ, महावितरण.