ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीत महिला, आदिवासी, दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ

लक्षित घटकांची जास्त मतदार नोंदणी करण्यात जिल्हा निवडणूक यंत्रणेला यश

ठाणे ः भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील संरक्षित आदिवासी गट तसेच महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानंतर राबविलेल्या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे २५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये निवडणूक कायदा सुधारणा अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार मतदार नोंदणी साठी १ जानेवारी या अर्हता दिनांकाऐवजी वर्षातील चार ताराखा (१ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर) या अर्हता दिनांक म्हणून घोषित केल्या आहेत.

असंरक्षित आदिवासी गट यांची मतदार नोंदणी...
केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील कातकरी, कोलाम, माडीया, गोंड या तीन आदिवासी जमाती मध्ये केला असून या समुहातील व्यक्तींची नावे मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गटातील  मतदारांच्या नोंदणीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प, शहापूर या विभागाच्या यंत्रणेद्वारे विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ४३३१ इतक्या असंरक्षित आदिवासी गटातील मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आली. सदर गटातील मतदार दुर्गम भागामध्ये, पाड्यांमधील रहिवास करत असतात. तसेच उदरनिर्वाहासाठी अशी माणसे कामानिमित्त स्थलांतर करत असतात. विशेष करुन विटभट्टी मजूर म्हणून स्थलांतर करीत असतात. त्यामुळे अशा गटातील मतदारांची नोंदणी आव्हानात्मक असताना देखील ४३३१ मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे.
 

महिला मतदारांच्या मतदार नोंदणीमध्ये वाढ...
ठाणे जिल्ह्यामध्ये महिला मतदारांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले. ज्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्याक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्याच्या महिला मतदारांच्या संख्येमध्ये ४०,२२६ ने वाढ झाली. जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर २ ने वाढला आहे.
दिनांक पुरुष महिला इतर एकूण मतदार     लिंग गुणोत्तर प्रमाण
९ नोव्हेंबर २०२२ ३३२८००९ २८०६०९३ ८५३ ६१३४९५५     ८४३
५ जानेवारी २०२३ ३३६७१२० २८४६३१९ १०७८ ६२१४५१७     ८४५
मतदार नोंदणी मध्ये झालेली वाढ
३९१११ ४०२२६ २२५ ७९५६२        २ ने वाढ.

तृतीयपंथी मतदारांची मतदार नोंदणी...
ठाणे जिल्हा तृतीयपंथी मतदार नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकावर असून एकूण तृतीयपंथी मतदार नोंदणी १०७८ इतकी आहे. राज्याची तृतीयपंथी मतदारांची मतदार नोंदणी ४७३५ असून त्यापैकी १०७८ इतक्या तृतीयपंथी मतदारांची नोंदणी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदार नोंदणी यंत्रणा आणि तृतीय पंथी व्यक्तींसाठी कार्यरत सामाजिक संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.
दिनांक   तृतीय पंथी मतदार
९ नोव्हेंबर २०२२ ८५३
५ जानेवारी २०२३ १०७८
एकूण झालेली वाढ २२५ ने वाढ

देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांची मतदार नोंदणी...
देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा एडस्‌ प्रतिबंध-नियंत्रणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संलग्न असलेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थामार्फत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येवून मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. या मतदार नोंदणीमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात येवून मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या १६२६१, विशेष संक्षिप्त कार्यक्रमापूर्वी एकूण एफएसडब्ल्यू मतदारांची नोंदणी १२२३०, विशेष संक्षिप्त कार्यक्रम २०२३ दरम्यान झालेली मतदार नोंदणी १७१ एकूण झालेली एफएसडब्ल्यू मतदारांची नोंदणी १२४०१ अशी आहे.
बेघर मतदारांची मतदार नोंदणी...

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'तील ४७५ कर्मचाऱ्यांची आरोग्य, नेत्र तपासणी