विद्यादानम्‌ प्रकल्पाच्या धर्तीवर हर्षद अहिरराव यांनी ३००० बंद्यांना मुलभूत शिक्षण

ठाणे कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपती पदक जाहीर

ठाणे ः ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद भिकनराव अहिरराव यांना कारागृहातील उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर झाले आहे. त्याबद्दल हर्षद अहिरराव यांचे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात
येत आहे. हर्षद अहिरराव १९९५ मध्ये कारागृह विभागात तुरुंगाधिकारी म्हणून रुजू झाले. आतापर्यंतच्या २७ वर्षाच्या कालावधीत त्यांनी येरवडा, नाशिक, नागपूर, मुंबई या अति संवदेशनशील मध्यवर्ती कारागृहांचे तुरुंगाधिकारी,
उपअधीक्षक या पदावर सेवा केलेली आहे. ठाणे येथे ते २०१९ पासून अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहताना हर्षद अहिरराव यांनी कारागृहातील बंद्याच्या सुधारणा आणि पुनर्वसन करण्याच्या हेतूने बंद्यांना विनातारण कर्ज, प्रौढ साक्षरता अभियान-उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कोव्हीड कालावधीत बंद्यांच्या नातेवाईकांना सामाजिक संस्थेच्या सहाय्याने रेशन पुरवठा, गरीब आणि गरजु बंद्यांना जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण आणि इतर सामाजिक संस्थेच्या मदतीने मोफत कायदेविषयक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. कारागृहातील बंद्यांकरिता योगा, मेडीटेशन, वैद्यकीय शिबीरे आयोजित केले. बंद्यांच्या आहारात सुधारणा
होण्यासाठी ॲटोमॅटीक चपाती मेकींग मशीन, बल्क प्रेशर कुकर, सोलर वॉटर हिटर, जिम, हॉट-पॉट, आदि अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात पुढाकार घ्ोतला.

विद्यादानम्‌ प्रकल्पाच्या धर्तीवर गेल्या तीन वर्षात हर्षद अहिरराव यांनी ३००० बंद्यांना साक्षर करुन मुलभूत शिक्षण दिले. अशा प्रकारे सुधारणात्मक कार्यक्रम अहिरराव यांनी राबविले. बंदी प्रत्यार्पण मोहिमेअंतर्गत देान वेळा मॉरिशस येथे ते गेले आहेत. हर्षद अहिरराव यांच्या एकूण २७ वर्षातील उल्लेखनिय कामगिरी करिता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे. हर्षद अहिरराव यांनी २०१६ ते २०१९ या काळात मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कारागृहातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोठया प्रमाणात कामे केली. २०१८ रोजी अहिरराव यांना कारागृहातील उल्लेखनिय कामगिरी करिता अपर पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक कारागृह-सुधार सेवा, पुणे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलेला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील ‘लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील भूमीपुत्र ठेकेदार संघटना'च्या वतीने अभिवादन