शिक्षण व्हिजन अंतर्गत नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

महापालिका शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

नवी मुंबई ः शिक्षण व्हिजन अंतर्गत नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या दरवर्षी १ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या शाळा इमारती या भव्यतम तसेच सर्व सुविधायुक्त असून प्रशस्त वर्गखोल्या आणि प्रसन्न वातावरणामुळे शिक्षणाची गोडी वाढत असल्याचे चित्र आहे. यासोबतच महापालिका शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित असावे यादृष्टीने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळा इमारतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून सदर कामास सुरुवात झालेली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्राथमिक ७९ आणि माध्यमिक २३ अशा शाळा असून ५५ इमारतींमध्ये या शाळा कार्यान्वित आहेत. या शाळांमधील सुरक्षा व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने सर्व शाळांचे निरीक्षण करुन शाळा इमारतींनुसार सीसीटीव्ही यंत्रणेचा सविस्तर आढावा घ्ोण्यात आला. त्यास अनुसरुन ५५ शाळा इमारतींमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविण्यात येऊन त्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे.

महापालिका तर्फे शाळांमध्ये हायडेफीनेशन सीसीटिव्ही कॅमेरे वापरण्यात येत असून १९५ बुलेट कॅमेरे आणि ४९२ डोम कॅमेरे वापरले जात आहेत. तसेच सदर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेची शाळा सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे महापालिका शाळेतील मुलांना अभ्यासासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.
-संजय देसाई, शहर अभियंता-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विद्यादानम्‌ प्रकल्पाच्या धर्तीवर हर्षद अहिरराव यांनी ३००० बंद्यांना मुलभूत शिक्षण