नवी मुंबई मध्ये डिसिप्लीन ट्रॅफिक कल्चर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच
आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर अदृश्य पोलिसांचा वॉच --पोलीस आयुक्त भारंबे
नवी मुंबई ः नवी मुंबई सुनियोजित शहर असले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे या शहरात पार्किंग आणि वाहतुकीची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे रस्त्यांमध्ये वाहने पार्किंग करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नवी मुंबई शहराला वाहतूक शिस्तीची सवय लागावी यासाठी या शहरात डिसिप्लीन टॅ्रफिक कल्चर आणण्याचा नवी मुंबई पोलिसांचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने ११ ते १७ जानेवारी या कालावधीत ‘वाहतूक सुरक्षा सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात पोलीस आयुवत भारंबे बोलत होते. याप्रसंगी सह- पोलीस आयुक्त संजय मोहिते, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री तथा व्हॉईसओवर आर्टिस्ट मेघना एरंडे, आदि उपस्थित होते.
वाहतुकीची शिस्त प्रत्येकाने अंगी बाळगणे गरेजे आहे. लहान मुलांना वाहतुकीचे धडे आत्तापासून दिल्यास लहान मुले संपूर्ण कुटुंबाला वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगू शकतात. त्यामुळे छोट्या पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी नवी मुंबई पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम घ्ोण्यात येणार असल्याचे पोलीस आयुवत भारंबे म्हणाले. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर अदृश्य पोलिसांचा वॉच राहणार असल्याचे देखील भारंबे यांनी सूचित व्ोÀले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्हॉईसओवर आर्टिस्ट मेघना एरंडे यांनी आपल्या शैलीत वेगवेगळ्या आवाजाच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचा संदेश देत सर्वांचे मनोरंजन केले. यावेळी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपयायुक्त तिरुपती काकडे यांनी आपल्या प्रस्तावनेत नवी मुंबई शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियम आणि अपघात नियंत्रण यावर नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छोट्या पोलिसाचे अनावरण करण्यात आले.