दि. बा. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन
दि.बा.पाटील यांच्या ७०व्या जयंती दिनी रोजगार मेळाव्याचे आयोजन
नवी मुंबई ः लोकनेते दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या लढ्याची माहिती भावी पिढीला व्हावी यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ‘शिखर समिती'चा मनोदय असल्याची माहिती ‘लोकनेते दि.बा.पाटील
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.
दि. बा. पाटील यांच्या ७० व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांची माहिती आणि ‘शिखर समिती'कडून पुढील काळात प्रकल्पग्रस्तांसाठी हाती घेण्यात येणाऱ्या आंदोलन आणि मागणी संदर्भात
माहिती देण्यासाठी ११ जानेवारी रोजी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी दशरथ पाटील यांच्यासह ‘शिखर समिती'चे सदस्य तथा महापालिकेचे माजी विरोध पक्षनेते दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, दीपक पाटील, सुनिल पाटील, शैलेश घाग, प्रताप पाटील, दीनानाथ पाटील, सुरेश वास्कर, प्रकाश पाटील, नितेश वैती, आदि उपस्थित होते.
लोकनेते दि. बा पाटील यांच्या १३ जानेवारी रोजी असलेल्या ७० व्या जयंती निमित्त ‘शिखर समिती'तर्फे पनवेल येथील महात्मा जोतीबा फुले सभागृह येथे सकाळी १० ते ५ दरम्यान भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर संध्याकाळी ६ वाजता निवड झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्राचे वाटप आणि दि. बा. पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन जासई येथे करण्यात आले आहे. तर कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉल येथे माजी आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती' स्थापन करण्यात आली आहे. ‘समिती'च्या वतीने सन-२०२० मध्ये नामकरणासाठी सुरु केलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ‘महाविकास आघाडी सरकार'ने घेतला. यानंतर सदर प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विनंती करण्यात आली आली आहे. एकंदरीतच विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या लढ्याला यश मिळाले असल्याचे दशरथ पाटील यांनी यावेळी सांगितले.