‘नवी मुंबइ प्रिमीयर लीग' चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाकडे
जय मल्हार फायटर आग्रोळी ‘एनएमपीएल'चा विजेता
नवी मुंबई ः बहुचर्चित ‘नवी मुंबइ प्रिमीयर लीग' (एनएमपीएल) चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाने तर उपविजेतेपद गोठिवली येथील साईप्रसाद संघाने पटकावले. विजेतेपदाची ग्राफाईट धातूपासून
तयार केलेली कलात्मक ट्रॉफी जय मल्हार फायटर संघाच्या खेळाडूंनी स्वीकारली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेली एनएमपीएल टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धा कोपरखैरणे येथील भूमीपुत्र मैदानावर पार पडली. नवी मुंबईतील
१६ मातब्बर संघांनी या स्पर्धेत भाग घ्ोतला होता. यावर्षी सोळा संघ मालकांचे सोळा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले. २४० खेळाडुंचा चुरशीचा खेळ पहावयास मिळाला. टेनिस बॉल क्रिकेट डॉट कॉम या संकेतस्थळावर या स्पर्धेचा
जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक क्रिकेट रसिकांनी आनंद घ्ोतला. १८४ देशांमध्ये या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. से नो टू ड्रग्सचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देताना युवकांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवत मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन करण्यात आले. नवी मुंबईतील क्रिकेटपटूंना एका भव्य प्लॅटफॉर्मवर व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईचा एकोपा वाढवा या
उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जय मल्हार संघाने ५ षटकात ५० धावांचे आव्हान साईप्रसाद संघासमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना साईप्रसाद संघ ४० धावांमध्ये आटोपला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना उत्कंठावर्धक ठरला.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, झेल घ्ोणे आणि कसलेल्या गोलंदाजीमुळे जय मल्हारच्या संघाने एनएमपीएल चषकावर स्वतःचे नाव कोरले. जय मल्हारच्या संघाला २ लाख रुपये रोख आणि विजयाचा चषक प्रदान करण्यात आला. उपविजेत्या
साईप्रसाद संघाला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. जय मल्हार संघाचे संघ मालक स्वरुप पाटील आणि सुधीर पाटील यांना ॲक्टिवा कुटर बक्षीस स्वरुपात प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी आमदार गणेश नाईक, या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीवस, माजी महापौर सुधाकर सोनवणे, एनएमपीएल आयोजन समितीचे स्वप्निल नाईक, आयपीएल कमिशनर दीपक पाटील, कुणाल दाते, ओंकार नाईक, प्रतिक पाटील, निलेश पाटील, तुषार पाटील, क्रिकेटप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.