गांवदेवी युवा मित्रमंडळ तर्फे आई एकविरा देवी मंदिर पदयात्रा सोहळण्याचे आयोजित

 नवी मुंबईची मानाची पालखी कार्ला गडाकडे मार्गस्थ

वाशी ः एकवीरा आईचा उदो उदो, आय माऊलीचा उदो उदोचा असा जयघोष करीत नवी नवी मुंबईतील मानाची पालखी ८ जानेवारी रोजी लोणावळा येथील कार्ला गडाकडे मार्गस्थ झाली. यावेळी नवी मुंबईतील हजारो एकवीरा देवी भक्तांनी पालखी दर्शनास हजेरी लावली.

गांवदेवी युवा मित्रमंडळ जुईनगरचे संस्थापक-अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे या वर्षीही जुईनगर ते श्री क्षेत्र आई एकविरा देवी मंदिर-कार्ला डोंगर असा पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ८ जानेवारी सकाळी ९ वाजता जुईनगर मधील गांवदेवी मंदिरात आरती केल्यानंतर गावाला प्रदक्षिणा घालून पालखी कार्ला गडाकडे रवाना झाली. नवी मुंबईची मानाची पालखी अशी ख्याती असलेल्या या पालखी आयोजनाचे यंदा अकरावे वर्ष असून या पालखी सोहळ्यात नवी मुंबईतील एक हजारच्या आसपास तरुण अधिकृत नोंदणी करुन मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सहभागी झाले आहेत. तर पालखी सोहळ्यावेळी ३०० पेक्षा जास्त ब्रास बँड वादकांनी पालखीसाठी सेवा दिली. या पालखी दर्शनास नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिकांनी देखील हजेरी लावली. आज १० जानेवारी रोजी पालखी कार्ला गडावर पोहोचणार असून आई एकविरा मंदीरा जवळ पालखी नाचवण्यात येईल. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आप महाराष्ट्र-कोकण विभाग तर्फे कार्यकर्ता मेळावा संपन्न