नवी मुंबई शहर स्वच्छ आहेच; त्यासोबतच रुग्णालये देखील स्वच्छ डॉ. कैलाशकुमार सिंग जगुतपाल

मॉरिशसचे आरोग्यमंत्री डॉ. जगुतपाल यांची वाशी रुग्णालयाला भेट

नवी मुंबई ः मॉरिशसचे आरोग्यमंत्री डॉ. कैलाशकुमार सिंग जगुतपाल यांच्यासह वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी देवीचंद आनंदी रे सीवुरुथून, डिजीटल आरोग्य सेवा अधिकारी डॉ. भोलाह ममल तसेच इलेक्ट्रॉनिक तथा सूचना-तंत्रज्ञान मंत्रालय दिल्लीचे संचालक रविंद्र कुमार यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयाला विशेष भेट देऊन तेथे कार्यान्वित असलेल्या ई-हॉस्पिटल आणि आयुष सेंटरची पाहणी केली.

मॉरिशसचे आरोग्यमंत्री डॉ. कैलाशकुमार सिंग जगुतपाल आणि त्यांचे अधिकारी भारतातील विविध शहरांमधील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन तेथील ई-हॉस्पिटल आणि आयुष सेंटरची पाहणी करुन त्याची कार्यप्रणाली जाणून घ्ोत आहेत. यामध्ये त्यांनी टाटा आणि अपोलो या खाजगी रुग्णालयांनाही भेटी देऊन पाहणी केली. याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वाशी सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.  

सदर भेटीदरम्यान मॉरिशसच्या आरोग्यमंत्र्यांनी मॉरिशस देशाची लोकसंख्या १२.७ लाख इतकी असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १५ लाखाहून अधिक असूनही डिजिटायझेशनमुळे आणि त्याचा सुयोग्य वापर होत असल्याने नवी मुंबई महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या गर्दीचे नियोजन व्यवस्थित होते असा अभिप्राय देत रुग्णालय व्यवस्थापनाची प्रशंसा केली. त्यासोबतच विशेषत्वाने रुग्णालयात एवढी गर्दी असूनही तेथील स्वच्छतेची नोंद घ्ोत विशेष कौतुक केले. नवी मुंबई शहर स्वच्छ आहेच; त्यासोबतच येथील रुग्णालये देखील स्वच्छ आहेत, असे निरीक्षण डॉ. व्ौÀलाशवुÀमार सिंग जगुतपाल यांनी नोंदविले. सदर भेटीत त्यांनी रुग्णालयातील ब्लड बँक, ट्रॉमा सेंटर येथेही भेट देत पाहणी केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उराशी मोठे स्वप्न बाळगत एका रिक्षा चालकाच्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले