उराशी मोठे स्वप्न बाळगत एका रिक्षा चालकाच्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले

रिक्षा चालकाची मुलगी झाली डॉक्टर 

नवी मुंबई -: पाचवीला गरिबी पुजलेली असताना देखील उराशी मोठे स्वप्न बाळगत आपल्या अचाट शक्ती व वडिलांच्या काबाड कष्टाची जोड याची सांगड घालत एका रिक्षा चालकाच्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.विश्रांती विलास कांबळे असे डॉक्टर या झालेल्या या मुलीचे नाव आहे.

विश्रांतीचे वडील विलास कांबळे हे उदरनिर्वासाठी लातूर येथून नवी मुंबईत १९८८ ला दाखल झाले.सुरुवातीला पडेल ते काम करून मोल मजुरी करून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला.त्यानंतर २००० साली.त्यांनी कष्टातून जमवलेल्या पैशातून रिक्षा घेतली.सध्या ते महापे हनुमान नगर येथील झोपडट्टीभागात वास्तव्यास आहेत. घरी हलाखीची परिस्थिती असल्याने विश्रांतीचे १० वी पर्यंत चे शिक्षण हे नवी मुंबई महनगरपालिकेच्या कोपर खैरणेतील अनुक्रमे सेक्टर २ व  ५ येथील शाळेत झाले आणि वाशीतील आय सी एल कॉलेजमध्ये १२ वी पर्यंत त्यानंतर पहिल्या वर्षी नीट मध्ये पास झाली. मात्र काही तांत्रिक कारणास्तव तिचा प्रवेश झाला नाही. मात्र विश्रांतीने निराश न होता दुबार नीट परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी पास झाली. यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी नेरूळ मधील डी वाय पाटील मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला आणि आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले. त्यामुळे अपार मेहनतीच्या जोरावर एका रिक्षा चालकाची मुलगी डॉक्टर बनल्याने विश्रांती कांबळे आणि तिचे वडील विलास कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यात ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार