तीन, दोन आणि एक रुपयांना मिळणारे धान्य आता जानेवारीपासून मोफत

पनवेल मध्ये 72 हजार तर नवीमुंबईत  54 हजार कुटुंबाना मिळणार वर्षभर मोफत धान्य 

खारघर: पनवेल शहर ग्रामीण तसेच नवी मुंबई परिसरातील निराधार, कमी उत्पन्न असलेल्या; तसेच अन्य वर्गातील नागरिकांना प्रतिकिलो तीन, दोन आणि एक रुपयांना मिळणारे धान्य आता आज, एक जानेवारीपासून मोफत मिळणार आहे. वर्षभर मोफत धान्य मिळणार असल्याने पनवेल मध्ये 72 हजार तर नवी मुंबई परिसरातील  54 हजार  कुटुंबीयांना त्याचा लाभ होणार आहे. त्या कुटुंबीयांच्या खिशावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
    राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत  रेशन कार्ड धारकांना पात्र लाभार्थाना  तीन रुपये प्रति किलो तांदूळ आणि दोन रुपये प्रति किलो दराने पस्तीस किलो धान्य दिला जात असे, दरम्यान   2020 मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला.  करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे  मार्च पासून  लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. ज्यामुळे अनेकांवर आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत  गरीब कुटूंबांना दिलासा देण्यासाठी एप्रिल 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गतदरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दिला जात होता.दरम्यान   ही सेवा बंद करून  राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सन 2023 या  एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने तीस  डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढले आहे. एक जानेवारीपासून अंत्योदय, प्राधान्य कुटुंबासह अन्य प्रकारातील वर्गांना सरसकट मोफत धान्य मिळणार आहे. ही योजना डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर असलेले आर्थिक ओझे कमी होण्यास मदत होणार आहे,त्यामुळे  लाभार्थी कुटुंबांना या पुढील एक वर्ष मोफत धान्य मिळणार असून पनवेल मध्ये 72 हजार तर नवी मुंबई शहरात 54 हजार कुटुंबे याचा लाभ मिळणार आहे.    
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन