पोलिसांकडून रिक्षा चालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन

कळंबोली वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांना वाहतूक नियमांबाबत प्रबोधन

पनवेल ः पोलीस रेझिंग-डे निमित्त खांदेश्वर स्टेशन येथे स्थानिक प्रकल्पग्रस्त खांदेश्वर रिक्षा चालक-मालक यांना कळंबोली वाहतूक पोलीस शाखेचे  वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली
वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 भाडे नाकारणे टाळावे, गणवेश परिधान करणे, मोबाईलवर बोलणे, रिक्षा स्टॅन्ड जवळ बेशिस्तपणे रिक्षा उभ्या न करणे, नागरिकांची सौजन्याने वागणे, ॲम्बुलन्सला रस्ता मोकळा करुन देणे, तंबाखू आणि मद्यपान पासून दूर
राहणे, आदि सूचना  कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक साठे यांनी रिक्षा चालकांना दिल्या. तसेच सदर सर्व सूचनांचे पालन आम्ही रिक्षा चालक काळजीपूर्वक करु, असे आश्वासन स्थानिक
रिक्षा चालकांनी यावेळी दिले.

याप्रसंगी स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, रिक्षाचालक भरत कावले, हनुमान भगत, दीपक पाटील, रवींद्र पाटील, सुरेश पाटील, राम भगत, विलीन धूंद्रेकर, मिलिंद भगत, प्रवीण
तेरडे, संदीप तांबडे, श्रीकांत कावळे, अशोक म्हात्रे, सचिन पाटील, कृष्णा तांबडे, मनोहर म्हात्रे, हरीश म्हात्रे, दिनेश भगत, भगवान पाटील, गौरव भगत, योगेश तांबडे, अनिल पाटील, बाबुराव पाटील, संजय हुद्दार, संतोष
पाटील, चंद्रकांत भगत, भाई पाटील, बाबुराव नाईक, रोशन पाटील, रुपेश पाटील, शिवाजी म्हात्रे, ज्ञानेश्वर भगत, आदि हे सर्व रिक्षा चालत ते उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तीन, दोन आणि एक रुपयांना मिळणारे धान्य आता जानेवारीपासून मोफत