लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक

रामशेठ ठाकूर यांच्या तर्फे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ'ला ५ कोटींची देणगी

पनवेल ः ‘रयत शिक्षण संस्था'चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नपूर्तीच्या रुपाने स्थापन झालेल्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ'ला ‘रयत शिक्षण संस्था'चे मॅनेजिंग कौंसिल सदस्य रामशेठ ठाकूर यांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली. देणगीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रयत शिक्षण संस्था'चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सातारा येथे झालेल्या सोहळ्यात सुपूर्द केला. यावेळी सर्व उपस्थितांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

रयत शिक्षण संस्था तर्फे खासदार शरद पवार यांचा सुवर्ण महोत्सवी सक्रिय कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेने विशेष अभीष्टचिंतन, कृतज्ञता सोहळा समारंभ आयोजित केला होता.  सदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार दिलीप वळसे-पाटील, ‘सिम्बॉयसिस'चे शं. बा. मुजुमदार, ‘रयत शिक्षण संस्था'चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्मवीर अण्णांनी ‘रयत शिक्षण संस्था'च्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. रयत शिक्षण संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून, ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी यावेळी केले.

या समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते खासदार शरद पवार यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यव्रÀमाचे  प्रास्ताविक ‘रयत शिक्षण संस्था'चे सचिव प्राचार्य डॉ. वि्ील शिवणकर यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी, मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी तर आभार प्रदर्शन ‘संस्था'चे सहसचिव राजेंद्र साळुंखे यांनी केले.

गेल्या पन्नास वर्षांमध्ये ‘रयत शिक्षण संस्था'च्या व्यासपीठावरुन खासदार शरद पवार यांनी विचार व्यक्त केलेल्या भाषणांचे संकलन केलेल्या ‘रयतच्या विचारमंचावरुन' या ग्रंथाचे तसेच विविध कार्यक्रमांमधील छायाचित्रांचे संकलन करुन सुवर्णबिंदु या कॉफी टेबल बुकचे आणि शरदोत्सव या दृकश्राव्य डॉक्युमेंटरीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच रयतवाणी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्‌घाटन करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलिसांकडून रिक्षा चालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन