विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय कामांचे नियोजन करण्याचे निर्देश

कोकण विभागातील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

नवी मुंबई ः विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय कामांचे नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत. मुंबई उपनगर, जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागीय आयुवत कल्याणकर बोलत होते. सदर बैठकीस उपआयुक्त (नियोजन) संजय पाटील, उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर विकास गजरे, कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध योजनांखाली प्राप्त तरतुदींचे सुयोग्य विनियोग होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि अधिक सोयीसुविधा पुरविण्याबाबत  काम करावे. सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय सुक्षम नियोजन करावे. तसेच शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी स्वतंत्र चिन्हांकित १ % निधीचा कल्पकतेने वापर करावा. यामध्ये जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे. कोकण विभागातील महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी  त्यांना आवश्यक सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे वाहने पुरविण्यासाठी कार्यवाही करावी, असे विभागीय आयुवत कल्याणकर यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत निधीचा १०० %  विनियोग करण्याच्या सक्त सूचना  कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी सदर बैठकीत दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१०० पेक्षा अधिक दुकानदारांकडून समोरील मार्जिनल स्पेसवर शेड टाकून बेकायदेशीरपणे साहित्य विक्री