सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महापालिका क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय येथे क्रीडा महोत्सव

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाले येथे ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका रंजना सोनवणे शिक्षणाधिकारी अरुणा यादव, विस्तार अधिकारी कल्पना गोसावी, मुख्याध्यापक अमोल खरसंबळे, रंजना वंनशा, जेपी सिंंग, आदि उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू आशिष गौतम आणि काजल सरोज यांच्यामार्फत मैदानात क्रीडा ज्योत क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर शाळेचे क्रीडाशिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. तद्‌नंतर प्रत्यक्ष सामन्यांना सुरुवात करण्यात आली. यावेळी खो-खो मुले शाहू महाराज विद्यालय विरुध्द जिल्हा परिषद शाळा तलासरी यांच्यामध्ये प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. तर कबड्डीमध्ये मुलींच्या सामन्यामध्ये मान्यवर काशीरामजी विद्यालय आणि शाहू महाराज विद्यालय यांच्यामध्ये सामना झाला. क्रीडा महेात्सवामध्ये कबड्डी, खो-खो, बुध्दीबळ, धावणे, लांब उडी, लंगडी लहान मुलांसाठी आकर्षक असे छोटे खेळ घ्ोण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी तलासरी, चिंचपाडा, सानपाडा, कोपरखैरणे, रबाले, पालघर त्याचबरोबर महापालिका क्षेत्र आंबेडकर नगर गट मधील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला असून जवळपास ३००० विद्यार्थी या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कमलेश इंगळे, अमोल वाघमारे, हेमंत भोईर, नेहा मनुचारी, अर्चना म्हात्रे, विजय चौरे, विनोद झापडे, ब्रिजलाल ठाकरे, लीना पाटील, माधुरी शिंनकर, आदिनाथ पालवे, राहुल शुक्ला यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'तर्फे खारघर परिसरातील जवळपास १० एकराहून जास्त आंतरभरती पाणथळ क्षेत्रांवर भराव