असोसिएशन ऑफ लायब्ररी आणि इन्फॉरमेशन प्रोफेशनल या राष्ट्रव्यापी संघटनेचे उदघाटन   

नवी मुंबई : असोसिएशन ऑफ लायब्ररी आणि इन्फॉरमेशन प्रोफेशनल (एएलआयपी) या राष्ट्रव्यापी संघटनेचे उदघाटन नुकतेच नवीन पनवेल येथील सी.के.टी महाविद्यालयात करण्यात आले. देशातील 100  पेक्षा अधिक प्राध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या संघटनेचे उदघाटन ग्रंथालय क्षेत्रातील दिग्गज प्राध्यापक डॉ.ए. आर.डी.प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लखनऊ येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विदयापीठाचे प्रा. डॉ. विनीत कुमार उपस्थित होते.  

यावेळी विनीत कुमार यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीवर विचार व्यक्त करताना ग्रंथपाल व ग्रंथालय क्षेत्रासाठी अनेक उपक्रम घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ.शशांक सोनवणे यांनी सुद्धा ग्रंथालय क्षेत्रात पदार्पण करीत असलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी कार्य करावे असे सुचविले. शिल्पा वाघचौरे यांनी संघटनेचे भविष्यकालीन योजनांचा उलगडा केला. तसेच डॉ.नंदकिशोर मोतेवार यांनी सर्व ग्रंथपाल सहका-यांना संघटनेत सक्रिय होण्याचे आवाहन केले. गणेश कुळकर्णी यांनी ग्रामीण भागातील ग्रंथपालांना येणाऱया समस्या मांडल्या. यावेळी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ.अजय कांबळे यांनी सूत्रे हाती घेतली. पहिल्याच दिवशी 50 उपस्थितांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत चैन स्नॅचींग करणा-या लुटारुंच्या कारवायात पुन्हा वाढ