केंद्रीय पर्यावरण विभाग, मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाच्या पॅनलकडे केलेल्या तक्रारीची दखल -पर्यावरणवादी

सिडको करणार खारघर पाणथळ क्षेत्राचे संरक्षण

नवी मुंबई ः पर्यावरणवाद्यांनी भरावामुळे लुप्त होत चाललेल्या अंदाजे सात हेक्टर पाणथळ क्षेत्राला संरक्षित करण्यात यश मिळवल्यामुळे खारघर नोडसाठी नवीन वर्षाची भेट म्हणता येईल मिळाली आहे. खारघर, सेक्टर-३६मध्ये सदर १० हेक्टर पाणथळ क्षेत्रातील काही भाग ‘सिडको'द्वारे व्हॅलीशिप गृहनिर्माण सोसायटीच्या निर्मितीसाठी आधीच देण्यात आला होता. मातीने भरलेले ट्रक पाणथळ क्षेत्राच्या किनारपट्टीवर भराव घालण्यासाठी धडकत होते. त्यामुळे या विरोधात पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवला, तर ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाला, राज्याचे मुख्यमंत्री तसेच उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या पाणथळ समितीकडे तक्रार करुन त्यांना पाणथळ क्षेत्र वाचविण्याची विनंती केली होती. यानंतर सदर प्रकाराची सिडको प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली. ‘सिडको'चे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी पर्यावरणवाद्यांसोबत सदर पाणक्षेत्राचे परीक्षण करुन तळ्याचे संरक्षण करण्याची ग्वाही दिल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

‘सिडको'ेद्वारे देण्यात आलेले क्षेत्र वगळून उर्वरीत पाणथळ क्षेत्रावर भरावाला बंदी केली जाईल, असेही कार्यकारी अभियंता रघुवंशी यांनी पर्यावरणवाद्यांना आश्वासित केले. खारघर वेटलँड्‌स एँड हिल फोरमच्या ज्योती नाडकर्णींनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की, डेब्रीजमुळे सपाटीकरण करताना पाणथळ क्षेत्राला भिती निर्माण होऊ शकते, अशी बाब ‘खारघर वेटलॅन्डस्‌ ॲन्ड हिल फोरम'च्या ज्योती नाडकर्णी यांनी सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर कार्यकारी अभियंता रघुवंशी यांनी त्यांचे सहकारी  रघुवंशींनी त्यांचे सहकार्यकारी अभियंता अमित चव्हाण यांना भरावाच्या कामामुळे पाणथळ क्षेत्रावर कोणत्याही परिस्थितीत परिणाम होता कामा नये, अशी सूचना केली. दुसरीकडे आगामी विकास कामांवेळी होणारे संभाव्य अतिक्रमण टाळण्यासाठी पाणथळ क्षेत्राला बांध घालण्याबाबत पर्यावरणवाद्यांकडून सूचना करण्यात आली.

दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाने ‘नॅटकनेवट'च्या तक्रारीला प्रतिसाद देण्यामार्फत राज्य पर्यावरण विभागाला कारवाई करण्याचे सूचित दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिवत मुख्य सचिव भूषण गगराणी यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देशही दिले. ‘नॅटकनेवट'च्या तक्रारीनुसार खारघर मधील सदर क्षेत्र बारमाही पाणथळ क्षेत्र असून, राष्ट्रीय पाणथळ क्षेत्र ॲटलासमध्ये सूचीबध्द करण्यात आलेले आहे. असे असूनही ‘सिडको'च्या भरावामुळे सदर पाणथळ क्षेत्र आता लुप्त होण्याचा मार्गावर आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विशेष नियोजन -विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर