रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये ऑनलाईन व ऑफ लाईन पद्धतीने 50 रोजगार मेळाव्यांचे आयोजन

नववर्षाच्या सुरुवातीला बेरोजगारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी  

            नवी मुंबई :- कोंकण विभागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत जिल्हा निहाय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये ऑनलाईन व ऑफ लाईन पद्धतीने 50 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई विभाग उप आयुक्त कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी दिली. या मेळाव्यांच्या माध्यमातून नववर्षाच्या सुरुवातीला बेरोजगारांसाठी रोजगाराच्या मोठ्या संध्या उपलब्ध होणार आहेत.

            कोंकण विभागातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत जानेवारी,फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यात एकूण 50 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.  त्यापैकी विभागीय मुख्यालय ठिकाणी दर महिन्यात एक –एक असे तीन मेळावे, मुंबई शहर या ठिकाणी जानेवारी महिन्यात एक मेळावा, मुंबई उपनगर या ठिकाणी 3 महिन्यात एकूण 8 मेळावे, ठाणे येथे 8, पालघर येथे-7, रायगड येथे-5, रत्नागिरी येथे-8, आणि सिंधुदूर्ग येथे -10 मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत. या रोजगार मेळाव्यांविषयी https://www.rojgarmahaswayam.gov.inया संकेत स्थळावर अद्यावत माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी  जिल्हा  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई विभागाचे उप आयुक्त कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केंद्रीय पर्यावरण विभाग, मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाच्या पॅनलकडे केलेल्या तक्रारीची दखल -पर्यावरणवादी