जेएनपीटी टाऊनशिप येथे युवकांच्या नोकऱ्या संदर्भात एका महत्वाच्या बैठकिचे आयोजन

12 जानेवारीला उरणमध्ये बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन मेळावा

उरण : जेएनपीटी टाऊनशिप येथे युवकांच्या नोकऱ्या संदर्भात एका महत्वाच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.कॉ.भूषण पाटील,सुधाकर पाटील,संतोष पवार,दिनेश घरत,राजेंद्र मढवी,प्रमोद ठाकूर,जितेंद्र ठाकूर,शेखर पाटील, अरविंद,चेतन गायकवाड,प्राध्यापक राजेंद्र मढवी,जागरकर्ते रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या बैठकीत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त  राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी 2023 रोजी मल्टीपर्पज हॉल, टाऊनशिप, उरण येथे दुपारी 3 वाजता बेरोजगार युवकांचा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला.या मेळाव्यासाठी प्रकल्पबाधित (सेझ )बेलपाडा, करळ, सावरखार,सोनारी,जसखार या गावाच्या सेझ कमीट्या व सर्व सरपंच आणि इच्छुक सर्वपक्षीय नेते मंडळी बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्व मंडळी बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेंव्हा जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी केले आहे.

 2025 पर्यंत उरण सेझ मध्ये दहा हजार पेक्षा अधिक नोकर भर्ती होणार आहे. मात्र ही भरती पैसे भरून नाही झाली पाहिजे किंवा दलाली करून नोकरी नाही लागली पाहिजे.कोणत्याही बेरोजगार युवकाला एकही रुपये न भरता आपल्या कर्तृत्वावर, गुणवत्तेवर युवकांनी नोकरी मिळवली पाहिजे त्यासाठी ज्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विविध प्रकल्पांना दिले, कंपन्याना दिले त्यांचा उरण परिसरातील विविध प्रकल्पातील, कंपनीतील नोकरीवर पहिला हक्क आहे मात्र दुर्दैवाने स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणाला उरणमध्ये नोकरी मिळत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकावर व त्या कुटूंबावर बेकारिची कु-हाड कोसळते. रोजगार नसल्याने त्या बेरोजगार युवकाला व त्यांच्या कुटुंबियांना विविध समस्याला सामोरे जावे लागते असे चित्र उरण तालुक्यात सर्वत्र असून उरण मध्ये पैसे घेउन नोकऱ्या लावणाऱ्या दलालांचे मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. असे दलाल भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. एका एका उमेदवाराकडून 4 ते 6 लाख रुपये घेऊन नोकरी लावण्यात येत आहे त्यामुळे असे दलाल तरुणांचे जीवन उध्वस्त करत आहेत. उरण तालुक्यातील सेझ बांधितांना अगोदर नोकरी मिळाली पाहिजे नंतर प्रकल्पग्रस्त सिडको बाधितांना नोकरी मिळाली पाहिजे अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपर्क प्रमुख रायगड भूषण एल.बी. पाटील यांची आहे. बेलपाडा, करळ , सावरखार, सोनारी, जसखार आदि गावात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे या गावातील नागरिकांच्या जमिनी सेझ प्रकल्पासाठी संपादित झाल्या आहेत. मात्र त्यांना अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहित तर सिडको, JNPT ने संपादित जमिनीवर आज अनेक प्रकल्प आहेत. प्रकल्प चालू होऊनही येथील बेरोजगारांना न्याय मिळत नाही. ज़री नोकर भर्ती झाली तरी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येत नाही. शिवाय उरणमध्ये पैसे घेऊन नोकरी  लावणारे अनेक दलाल असल्याने अशा दलाला मूळे बेरोजगार युवकांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याने जेएनपीटी सेझ , जेएम बक्षी या कंपन्याकडे उरण मधील जास्तीत जास्त स्थानिक भूमीपुत्रांना नोकरी मिळावी . एक रुपयाही न देता बेरोजगारांना नोकरी मिळावी यासाठी गावोगावी विविध कमिटया स्थापन करण्यात यावे व या कमिट्या मधून बेरोजगार युवकांची भर्ती व्हावी या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या उद्देशाने 12 जानेवारी 2023 रोजी अर्थात राष्ट्रीय युवा दिनी उरणमध्ये टाऊनशिप येथील मल्टीपर्पज हॉल येथे दुपारी 3 वाजता बेरोजगार युवकांचा मेळावा  भरविला जाणार आहे. यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

किमान २०० पथविक्रेत्यांची तत्परतेने नोंदणी करण्याचे आढावा बैठकीप्रसंगी प्रभारी आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश