‘खारघर'चे नाव पुन्हा जगाच्या नकाशावर

खारघर टेकडीवर सुमारे १०६ हेक्टर जागेवर खारघर हिल टाऊनशिप उभारणार

खारघर ः पनवेल महापालिका झाल्यानंतर खारघर वसाहत ‘सिडको'कडे हस्तांतरण झाल्यामुळे ‘सिडको'ने शहराच्या नागरी  सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी ‘सिडको'कडून खारघर मध्ये विकसित केला जाणारा खारघर कार्पोरट पार्क, नव्याने विकसित होत असलेल्या गोल्फ कोर्स, नवी मुंबई मेट्रो सुरु होणार असल्यामुळे तसेच खारघर टेकडीवर सुमारे १०६ हेक्टर जागेवर खारघर हिल टाऊनशिप उभारणार असल्यामुळे सन २०२३ मध्ये खारघर परिसरातील अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचा असल्याचे दिसून येते.

खारघर वसाहत ‘सिडको'कडे हस्तांतर झाली असले तरी खारघर, सेक्टर-२२ ते ३३ परिसर ‘सिडको'च्या ताब्यात आहे. खारघर मधील पांडवकडा, गोल्फ कोर्स आणि सेंट्रल सेन्ट्रल पार्क शेजारील १५० हेक्टर मोकळ्या जमिनीवर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर ‘सिडको'कडून कॉर्पोरेट पार्क विकसित केले जाणार आहे. खारघर मध्ये उभारल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट पार्कचे काम मार्गी लावण्यासाठी जागतिक पातळीवरील वास्तुविशारद यांच्याकडून आराखडा मागवून नवीन वर्षात कार्पोरेट पार्कच्या कामाला अधिक गती देण्याचा ‘सिडको'चा प्रयत्न आहे. कॉर्पोरेट पार्कच्या पहिल्या टप्यात ‘सिडको'ने १०.७ हेक्टर जमिनीवर चार फुटबॉल स्टेडीयम केले आहेत. तर हाकेच्या अंतरावर साडे तीन एकर जागेवर रग्बी फुटबॉल मैदान विकसित केला जाणार आहे.

खारघर टेकडीवर खारघर हिल टाऊनशिप उभारण्याचा ‘सिडको'चा प्रयत्न सुरु काही दिवसापूर्वी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी यांनी काही उद्योजक समवेत पाहणी करुन खारघर तसेच हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या नवी मुंबई विमानतळ तसेच तुर्भे ते खारघर अशा डोंगर फोडून तयार केल्या जाणाऱ्या रस्त्याची माहिती देऊन उद्योजकांना त्याचे महत्व पटवून दिल्याचे समजते. या प्रकल्पाबरोबर ‘सिडको'कडून खारघर, सेक्टर-२२ ते ३३ मध्ये अकरा होलचे गोल्फ मैदान विकसित करण्यात आले होते. मात्र, व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या प्रयत्नामुळे गोल्फ कोर्सचे रखडलेले काम पूर्ण करुन १८ होलचे गोल्फ कोर्स मैदान विकसित करण्यात येत असून सदर काम २०२३ मध्ये पूर्ण करुन मैदान खेळाडुंसाठी खुले केला जाणार केला जाणार आहे. तसेच येत्या सहा महिन्यात खारघर मार्गे धावणाऱ्या बेलापूर ते खारघर नवी मुंबई मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मे अखेर पर्यंत नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते पेंधर मार्गावर धावण्याची शवयता वर्तविली जात आहे. त्यामुळे २०२३ या नवीन वर्षात खारघर मधील अनेक प्रकल्प मार्गी लागणार असल्यामुळे ‘खारघर'चे नाव पुन्हा जगाच्या नकाशावर येणार, यात शंका नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजा घोट रस्ता धोकादायक