निराधार नागरिकांच्या अंगावर मायेची उबदार चादर टाकून नवीन वर्षाची सुरुवात

निराधारांच्या अंगावर मायेच पांघरुण

वाशी ः बरेच जण नवीन वर्षाचे स्वागत पार्टी, जल्लोष करुन साजरा करतात. मात्र, समाजसेवक परशुराम ठाकूर यांनी शहरातील निराधार नागरिकांच्या अंगावर मायेची उबदार चादर टाकून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. सध्या हिवाळा सुरु झाला असून कड्याक्याची थंडी जाणवत आहे. थंडीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून सर्वसामान्य नागरीक ब्लँकेट चादर किंवा स्वेटरचा आधार घ्ोतात. या शहरात असे काही लोक आहेत, त्यांच्या जवळ ब्लँकेट तर दूर दोन वेळचे जेवण देखील उपलब्ध नाही, झोपायला जागा देखील नाही. असे लोक उघड्यावरच जागा भेटेल तिथे आपला निवारा शोधत असतात. त्यामुळे अशा लोकांना थंडीला सामोरे जावे लागते. गरीबी आणि हलाखीची परिस्थिती असल्याने या नागरिकांना ब्लँकेट घेणे फारसे परवडत नाही.

त्यामुळे धांगडधिंगा घालून पैशाची उधळण करत नवीन वर्ष साजरा करणाऱ्या प्रथेला बगल देत  निराधारांना मायेची ऊब देऊन नवीन वर्ष साजरा करण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते परशुराम ठाकूर यांनी केला. त्यानुषंगाने ‘परशुराम ठाकूर मित्र मंडळ'च्या वतीने शहरात फिरुन उघड्यावर झोपलेल्या निराधार लोकांच्या अंगावर ब्लँकेट पांघरूरुन मायेची ऊब दिली. याप्रसंगी परशुराम ठाकूर यांच्या समवेत केशव ठाकूर, दिनकर ननवरे, किशोर पाटील, वरे मामा, अथर्व ठाकूर, अक्षय ठाकूर, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘खारघर'चे नाव पुन्हा जगाच्या नकाशावर