नवी मुंबई महापालिकेचा ३१ व्या वर्धापन दिन १ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा

महापालिकेचा ३१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेचा ३१ व्या वर्धापन दिन १ जवारी रोजी मोठ्या उत्साहात विष्णुदास भावे नाटयगृह येथे साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्यासपीठीय कार्यक्रमाप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि सुजाता ढोले, मुख्य लेखा-वित्त अधिकारी धनराज गरड, उपाायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे, अनंत जाधव, नगररचना विभागाचे सहा.संचालक सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, आदि उपस्थित होते.  

कोव्हीड काळाने आपल्याला खूप काही शिकविले. आपल्या जवळची माणसे गेल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही आपण उपस्थित राहू शकलो नाही, याचेही दुःख आपण पचवले. या काळात नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील नागरिकांप्रमाणेच शेजारील शहरांमधील नागरिकांनाही उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.  

नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा ३१ वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे, याचा आनंद आहे. तसेच नवी मुंबईच्या प्रगतीत सर्व घटकांचे अनमोल योगदान असल्याचेही आमदार सौ. म्हात्रे म्हणाल्या.

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील वर्षभरात नवी मुंबई महारपालिकेला मिळालेल्या राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पुरस्कार, सन्मान यांचा विशेष उल्लेख केला. त्याचप्रमाणे महापालिका मार्फत अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण, समाजविकास, क्रीडा, स्वच्छता, सुशोभिकरण, पर्यावरण, सांस्कृतिक उपक्रम, प्रवासी सेवा अशा विविध क्षेत्रात वर्षभरात झालेल्या कामांचे सविस्तर विवेचन केले. महापालिकेला मिळालेल्या सर्व सन्मानात अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीचा महत्त्वाचा वाटा असून त्यासोबतच स्वच्छतेमधील देशात तृतीय आणि राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मानांकनात आपले स्वच्छता कर्मचारी आणि जागरुक नागरिक यांच्या सक्रिय सहभागाचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निराधार नागरिकांच्या अंगावर मायेची उबदार चादर टाकून नवीन वर्षाची सुरुवात