एपीएमसीतील मोकळ्या भुखंडावरील अतिक्रमणात वाढ

सिडकोने एलिएमसीसाठी राकज ठेवलेल्या भुखंडावर दिवसेंदिवस अतिक्रमण होऊन अनैतिक प्रकारात वाढ

नवी मुंबई-: एपीएमसी दाना बाजारच्या पूर्वला सिडकोने एलिएमसी साठी राकज ठेवलेल्या भुखंडावर दिवसेंदिवस अतिक्रमण होऊन अनैतिक प्रकारात वाढ होतआहे. आणि याचा नाहक त्रास सेक्टर २६  मधीक रहिवाशांना सहन करावा लागत असल्याने या भुखंडावरील अतिक्रमणावर मनपा व नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करावी अशी मागाणी नवी मुंबई भाजपा उपाध्यक्ष संकेत डोके यांनी केली आहे.

सिडकोच्या माध्यमातून वाशी सेक्टर १९ एफ मध्ये भुखंड क्रंमांक १ हा एपीएमसी निगडित कामाकरिता आरक्षित ठेवला आहे. मात्र मागील कित्येक वर्षापासून सदर भुखंड मोकळा असल्याने त्यावर  भूमाफियांकडून दिवसेंदिवस अतिक्रमण  केले जात आहे. याआधी याठिकाणी झोपड्या बांधून विकल्या जात असल्याच्या व त्यांच्या कडुन पाण्याचे पैसे उकळले गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.त्यामुळे या ठिकाणी अल्पावधीतच मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. झोपडपट्टी वाढल्याने रात्री आपरात्री जुगाराचे डाव रंगत असुन हे ठिकाण अंमली  पदार्थ विक्रेत्यांचे आश्रय स्थान बनले असून येथून मोठ्या प्रमाणात  अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय तसेच  रात्री देह  विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे याचा नाहक त्रास सेक्टर २६ मधील महिला वर्ग,लहान मुले व स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे.तर आता या भुखंडावर लाकडी पेट्या बनवण्याचा कारखाना तसेच अवैध वाहन पार्किंग सुरु करुन गॅरेज चालवला जात आहे.मात्र सदर भुखंडावरील  अतिक्रमणावर मनपा व नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन भुखंड अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी नवी मुंबई भाजपा उपाध्यक्ष संकेत डोके यांनी केली आहे.

तुर्भे अतिक्रमण विभागाचा आशीर्वाद ?

वाशी सेक्टर १९ एफ मध्ये भुखंड क्रंमांक १ या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतीक्रमण झाले आहे.मात्र सदर अतिक्रण एका राजकीय नानाच्या आशीर्वादाने उभे राहिले असून या अतिक्रमणातुन चांगला मलिदा ओरपण्यास मिळत असल्याने तुर्भे विभाग अतिक्रमण अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे दिवसेंदिस या ठिकाणी अतिक्रमण वाढत असून आता मनपाचे पाणी चोरून सर्व्हिस सेंटर देखील चालवले जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध स्वच्छता स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न