न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या 'रामबाग' मध्ये नवीन वर्षनिमित्त 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'  या सुरेल गाण्यांची मैफिल

रविवारी 'रामबाग'मध्ये 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'  

पनवेल : दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या 'रामबाग' मध्ये नवीन वर्षनिमित्त 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'  या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवार दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.  

          माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी 'स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग' साकारली आहे. १४ एकर जागेतील या 'रामबाग' उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक या ठिकाणी आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. आणि हा संगीत कार्यक्रम सांयकाळी असल्याने या कार्यक्रमाचा रसिकांना मनमुराद आनंद घेता येणार आहे. हा कार्यक्रम निशुल्क असून अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन ९०२९५८०३४३ किंवा गणेश जगताप ९८७०११६९६४ संपर्क साधावा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसीतील मोकळ्या भुखंडावरील अतिक्रमणात वाढ