पोलीस भरती करिता नवी मुंबई मुख्यालयाकडे एकूण १२,३७५ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त

 नवी मुंबई पोलीस भरतीसाठी १२,३७५ अर्ज

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुवतालय आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलीस शिपाई पदाकरिता नवी मुंबई पोलीस मुख्यालयाकडे जवळपास एकूण १२,३७५ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये १०,४३४ पुरुष तर १७९४ महिला तसेच १४७ माजी सैनिकांचा समावेश आहे.

पोलीस शिपाई भरती प्रक्रिया अंतर्गत मैदानी चाचणी (५० मार्कस्‌) आणि लेखी परीक्षा (१०० मार्कस्‌) या दोन टप्प्यामध्ये पार पडणार आहे. यामध्ये सर्वात प्रथम उमेदवारांची मैदानी चाचणी २ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीत कळंबोली मधील नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्रीडांगणावर होणार आहे. मैदानी चाचणी मध्ये पुरुष उमेदवारांसाठी गोळा फेक, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे त्याचप्रमाणे महिला उमेदवारांकरिता गोळा फेक, १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, आदि स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुवत (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. याप्रसंगी विशेष शाखाचे पोलीस उपायुवत प्रशांत मोहिते उपस्थित होते.

नवी मुंबई पोलीस आयुवतालय आस्थापनेवर रिवत असणाऱ्या २०४ पोलीस शिपाई पदांकरिता २०२१ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी उमेदवारांकडून ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आवेदनपत्रे ऑनलाईन मागविण्यात आली होती. परंतु, उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत येत असलेल्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस मुख्यालयाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सदर तक्रारींचे निराकरण व्हावे आणि सर्व उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुवतालयाकडे पोलीस शिपाई भरतीसाठी एकूण १२,३७५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, असे पोलीस उपायुवत संजयकुमार पाटील यांनी सांगितले.

पोलीस शिपाई भरती प्रक्रिया अंतर्गत आता २ ते १३ जानेवारी २०२३ यादरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने मैदानी चाचणीवेळी रेडिओ  फ्रिक्वेन्सी ओळख (आर.एफ.आय.डी.) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून प्रत्येक टप्प्यावर सीसीटिव्ही कॅमेरे आणि व्हिडीओग्राफीचा देखील वापर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या ऑनलाईन आवेदन अर्जाचे महाआयटी यांच्याकडून पडताळणी करुन उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवारांना येणाऱ्या अडचणी-समस्यांचे निराकरण होण्यासाठी उमेदवारांनी नवी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर संपर्क साधणे आवश्यक आहे, असे पोलीस उपायुवत पाटील यांनी सूचित केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नाताळ निमित्त सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद विद्यार्थ्यांना मॅकडोनाल्ड तर्फे पार्टी