अनधिकृतपणे विजेचा वापर करुन ग्राहकांनी ५१ लाख ७० हजार रुपयांचे ‘महावितरण'चे नुकसान

वाशी विभागात एप्रिल पासून १.१७ कोटींची वीजचोरी उघडकीस

नवी मुंबई ः महावितरण भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची मोहीम सातत्याने सुरु आहे. वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने, यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यकारी अभियंता शामकांत बोरसे आणि त्यांच्या पथकाने एप्रिल २०२२ पासून ते आता पर्यंत वाशी विभागात १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली आहे. याशिवाय अनधिकृतपणे विजेचा वापर करुन ग्राहकांनी ५१ लाख ७० हजार रुपयांचे ‘महावितरण'चे नुकसान झाले आहे. महावितरण भांडूप परिमंडलात वीज चोरी पकडण्याची मोहीम सतत चालू असते. एप्रिल २०२२ ते आतापर्यंत ‘महावितरण'च्या वाशी मंडळातील ऐरोली, कोपरखैरणे आणि वाशी येथील ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत विविध ठिकाणी वीजचोरी तसेच विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले. विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार ३३५ प्रकरणात १ कोटी १७ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. याशिवाय विद्युत कायदा २००३च्या कलम १२६ नुसार ७२ प्रकरणात ५१ लाख ७० हजार रुपयांचा अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलीस भरती करिता नवी मुंबई मुख्यालयाकडे एकूण १२,३७५ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त