श्रीमती संजिवनी पाटील-जाधव यांनी स्विकारला सहायक संचालक पदाचा कार्यभार

विभागीय माहिती कार्यालयात संजिवनी पाटील-जाधव यांनी सहायक संचालक पदाचा कार्यभार स्विकारला

नवी मुंबई : कोकण विभागाच्या विभागीय माहिती कार्यालयातील सहाय्यक संचालक (माहिती) या रिक्त पदाचा कार्यभार संजिवनी पाटील-जाधव यांनी आज स्विकारला. यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. 

          पाटील-जाधव ह्या यापूर्वी विभागीय संचालक कार्यालय, औरंगाबाद येथे उपसंपादक या पदावर कार्यरत होत्या. त्यांना 21 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार   सहाय्यक संचालक (माहिती) या पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.  पाटील-जाधव यांनी  यापूर्वी उप माहिती कार्यालय शिर्डी येथे उपसंपादक या पदावर त्यानंतर विभागीय संचालक कार्यालय औरंगाबाद येथे उपसंपादक या पदावर काम केले आहे. कला शाखेतील पदवी, पत्रकारिता या माध्यमातून बीजे, एमजे, एमफील या क्षेत्रातून शिक्षण घेतलेल्या संजिवनी पाटील-जाधव  यांना पत्रकारीतेचा दांडगा अनुभव आहे. शासन सेवेत येण्यापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथील दै.लोकपत्र या दैनिकात उपसंपादक या पदावर काम केले असून आकाशवाणी केंद्रात प्रादेशिक वृत्तनिवेदिका तसेच एमसीएन(माध्यम)या वृत्तवाहिनीत निवेदिका म्हणून काम पाहिले आहे.

          यावेळी डॉ.गणेश मुळे म्हणाले की, पाटील-जाधव यांच्याकडे असलेल्या पत्रकारितेतील अनुभवाचा कोकण विभागात शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याच्या दृष्टीकोनातून उपयोग होईल.

         कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  संजिवनी पाटील-जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भाडेकरुकडील कागदपत्रांची स्वतःहुन पडताळणी करुन भाडे करारनामा करणे महत्वाचे