भाडेकरुकडील कागदपत्रांची स्वतःहुन पडताळणी करुन भाडे करारनामा करणे महत्वाचे

घर भाड्याने देण्यासाठी पोलीस एनओसीची अट बंधनमुवत

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीमध्ये घर भाड्याने देताना त्याची पोलिसांकडून एनओसी घेणे बंधनकारक करण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता यापूर्वी घरे भाड्याने दिल्यानंतर घर मालक अथवा संबंधित भाडेकरु अर्जावर फवत एका अर्जावर संबंधित स्थानिक पोलीस ठाणेचा शिवका मारुन घेत असे. ती एनओसी नाही. त्यामुळे यापुढे नवी मुंबई पोलीस आयुवतालयाच्या हद्दीत कुणीही घर भाड्याने दिल्यानंतर त्याची पोलिसांकडून एनओसी घेणे गरजेचे नाही. पण, घर भाड्याने देण्यापूर्वी आपल्या भाडेकरुची इत्यंभूत माहिती घर मालकाजवळ गरजेचे आहे, अशी सूचना विशेष शाखेचे पोलीस उपायुवत प्रशांत मोहिते यांनी केली आहे. याप्रसंगी पोलीस उपायुवत (मुख्यालय) संजयकुमार पाटील उपस्थित होते.

वास्तविक पाहता घर मालकाने भाडेकरु ठेवण्यापूर्वी त्याच्याकडून सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन त्याची योग्य पध्दतीने पडताळणी करुनच भाडे करारनामा करतात. त्यामुळे घर मालकाकडूनच भाडेकरुची योग्य प्रकारे माहिती ठेवली जाते. परिणामी, स्थानिक पोलीस ठाणे येथे जाऊन पोलीस ना-हरकत प्रमाणपत्र करिता नव्याने अर्ज करणे गरजेचे नाही. उलट पोलिसांकडून याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र दिले जात नसून फवत अर्जावर संबंधित पोलीस ठाणेचा शिवका असतो. त्यामुळे घर मालक अथवा भाडेकरुंनी घर भाडे संदर्भात पोलीस ठाण्यात जाऊन एनओसी घेण्याची गरज नाही, असे पोलीस उपायुवत प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले.

जर आपल्या भाडेकरुने दिलेल्या कागदपत्रांबाबत संशय वाटल्यास भाडेकरु पोलिसांना कळवू शकतात. किंवा त्यांच्या वास्तव्यास आलेला भाडेकरु बांग्लादेशी अथवा परदेशी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाटल्यास घर मालकाने याची माहिती स्थानिक पोलीस ठाणेला दिली पाहिजे. अन्यथा संबंधित भाडेकरु कडून एखादा अपराध घडल्यास घर मालकाला दोषी ठरविले जाऊ शकते. त्यामुळे यापुढे घर भाड्याने देताना घर मालकांनी आपल्याकडील भाडेकरुची माहिती आवश्यक कागदपत्रांसह स्वतःकडे ठेवावी. तसेच आवश्यकता वाटल्यास त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे स्वतःहुन जाऊन नोंद करण्यास हरकत नाही, असेही पोलीस उपायुवत मोहिते यांनी यावेळी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार' मनोज पाटील यांना जाहीर