विवेकानंद संकुल, सानपाडा यांचा वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन संपन्न

विवेकानंद संकुलाच्या माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण साजरे

 नवी मुंबई ः छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेचे माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल, सानपाडा यांचा वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन संस्कृती कलादर्पण हा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात २६ डिसेंबर रोजी साजरा झाला. प्रमुख पाहुणे उद्योजक म्हणून कौस्तुभ विनायक गोखले तसेच सरचिटणीस निलेश रेवगडे, उपाध्यक्ष सोनावणे सर, मोहन ढवळीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण या संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर त्रिविक्रम जोशी सर यांनी प्रास्ताविक केले.

लहानपणासूनच धोका पत्करून त्यातून शिका आणि पुढे जा, जीवनात स्वतःचे स्थान निर्माण करा त्यासाठी कष्ट करा; सामाजिक कामात भाग घ्या हाच बिजमंत्र पुढच्या पिढीलाही द्यावा असे गोखले यांनी आपल्या भाषणात सांगितले. याप्रसंगी अनेक देणगीदार, मराठी व इंग्रजी माध्यमाचे सर्व विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुस्तक ,गुलाबपुष्प देवून स्वागत करून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणगे सर सौ इंदोरे मॅडम यांनी; परिचय व स्वागत सौ मुडपे मॅडम यांनी; तर बक्षीस यादी वाचन सौ. मिसाळ मॅडम यांनी केले. मुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  सांस्कृतिक प्रमुख सौ मुडपे मॅडम, तसेच  सौ.शिंदे मॅडम, सौ.सोलापूरकर मॅडम, ठाणगे सर, सौ.पोटे मॅडम, सौ इंदोरे मॅडम, सौ.कांबळे मॅडम, सौ मिसाळ मॅडम, महाडिक सर, कु.ओमकार सर, सौ मराठे या सर्व शिक्षकांचे, तसेच लाड सर, गांजरे, जाधव यांनी मेहनत घेतली

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गाव तसं चांगलं; पण वेशीला टांगलं...