सेवानिवृत्त होणाऱ्या २ महापालिका कर्मचाऱ्यांनी राबविला शून्य कचरा उपक्रम

सेवानिवृत्त होणाऱ्या २ महापालिका कर्मचाऱ्यांनी राबविला शून्य कचरा उपक्रम

नवी मुंबई ः घनकचरा व्यवस्थापनाच्या ‘थ्री आर' संकल्पनेमध्ये ‘रिड्युस' अर्थात कमीत कमी कचरा निर्माण करणे एक महत्वाचा भाग असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांमध्ये कचऱ्याची कमीत कमी निर्मिती करुन तो उपक्रम ‘शून्य कचरा उपक्रम' म्हणून आयोजित केला जाणे, एक महत्वपूर्ण बाब आहे. स्वच्छ सर्वेक्षण मधील सदर महत्वाच्या बाबीकडे नवी मुंबई महापालिकाच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून नागरिकांनी आपले विविध समारंभ, कार्यक्रम शून्य कचरा उपक्रम म्हणून राबवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शून्य कचरा तत्वाचा अंगिकार करत नवी मुंबई महापालिकेतून या महिन्यात सेवानिवृत्त होत असलेल्या भरत देशमुख आणि देवेंद्र ब्राम्हणे या २ कर्मचाऱ्यांंनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शून्य कचरा उपक्रम राबविला. या कार्यक्रमात जेवणाकरिता काचेच्या प्लेटस्‌चा तसेच स्टीलच्या चमच्यांचा वापर करण्यात आला. सजावटीकरिता रंगीत कागद, कापड आणि फलकांकरिता कार्डबोर्डचा वापर करण्यात आला. पाणी आणि सरबत पिण्याकरिता बायोडिग्रेडेबल इकोफ्रेन्डली ग्लासचा तसेच उपस्थितांना रिटर्न गिपटही पेपर बॅग आणि रिसायकल पध्दतीने निर्माण केलेल्या डायऱ्या आणि सीड पेन्सिल यांचे देण्यात आले.

कार्यक्रमानंतर उरलेले अन्न गरीब गरजुंना वाटप करण्यासाठी शेल्टर ग्रुप या सेवाभावी संस्थेकडे देण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याकरिता हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन स्वतंत्र कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या कचरा कुंड्यांवर माझा कचरा माझी जबाबदारी असे घोषवाक्य ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच वॉश बेसिन जवळ पाणी वाचवा, असा संदेशही नजरेत भरेल अशा ठिकाणी लावण्यात आला होता.

याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आवजर्ुन उपस्थित रहात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच स्वच्छतेविषयी जागरुकता दाखवून सेवानिवृत्ती स्नेहसंमेलन शून्य कचरा उपक्रम म्हणून साजरे केल्याबद्दल कौतुक केले. याप्रसंगी बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांनीही शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला देशातील तृतीय क्रमांकाचे आपले मानांकन उंचाविण्यासाठी समर्थपणे सामोरे जात असताना नागरिकांनी जागरुकतेने आपले विविध प्रकारचे समारंभ, कार्यक्रम शून्य कचरा उपक्रम म्हणून राबवून स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विवेकानंद संकुल, सानपाडा यांचा वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन संपन्न