शाळेची 'फी' भरू शकत नसल्याने कित्येक वर्षे विद्यार्थी घरीच ; शाळा विद्यार्थ्याला दाखला देण्यास मनाई

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तक्रारीनंतर महापालिका शिक्षण विभागाची जयपुरीयर शाळेला नोटीस

नवी मुंबई :- शाळेची 'फी' न भरल्यामुळे विद्यार्थ्याला शालेय शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सानपाडा-पामबीच येथील जयपुरीयर शाळेला  गुरुवार,दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तक्रारीनंतर महापालिका शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे.

सानपाडा-पामबीच येथील जयपुरीयर शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु.एकलव्य जयवंत पवार या विद्यार्थ्याच्या पालकांनी आर्थिक परिस्थितीमुळे शाळेची 'फी' न भरल्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला सन २०२० पासून शिक्षणापासून वंचित ठेवले. हा विद्यार्थी इयत्ता चौथीत शिकत असताना कोविड काळात या विद्यार्थ्यांच्या वडिलांची नोकरी गेली. या काळात शाळेची 'फी' न भरल्यामुळे विद्यार्थ्यांला शाळेने ऑनलाईन वर्गाला बसू दिले नाही. शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्याची शिकण्याची आवड असतानाही शाळेने विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवले. यावेळी शाळेने फक्त विद्यार्थ्यांला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. शाळेची 'फी' न भरल्यामुळे शाळेने इयत्तेनुसार विद्यार्थ्याची 'फी' वाढवली. आजही विद्यार्थ्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे ते शाळेची 'फी' भरू शकत नसल्याने कित्येक वर्षे विद्यार्थी घरीच आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्याला दाखला देण्यास मनाई करत आहेत. विद्यार्थ्याला शाळेत बसू दिले जात नसल्याने आता विद्यार्थी मानसिक ताणतणावात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांसारखे शाळेत जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडे सदर शाळेबाबत लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक परिस्थितीमुळे शाळेची 'फी' भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला शालेय शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या जयपुरीयर शाळेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी २० डिसेंबर २०२२ रोजी महापालिका शिक्षण उपायुक्त योगेश कडूस्कर यांना निवेदन देऊन केली होती. त्या तक्रारीनुसार मनपा शिक्षण विभागाने या शाळेला नोटीस बजावून कुटल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असा समज दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देशातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जवळपास १०८ पदकांवर आपले नाव कोरले