नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी मांडला खेळ

‘मनसे'च्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन ताळ्यावर

वाशी ः शाळा सुरु असतानाच विना कार्यादेश कोपरी गाव शाळा क्रमांक-३० दुरुस्तीचे काम सुरु करुन ठेकेदार आणि नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ मांडला होता. या विरोधात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'ने संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन ताळ्यावर आले आहे. सदर कामाला आता स्थगिती दिली आहे, अशी माहिती महापालिका अभियंत्यांनी दिली.

महापालिका कोपरी गाव शाळा क्रमांक-३० दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, सदर काम विन ाकार्यादेश सुरु केले होते. या शाळेत शिकणाऱ्या ‘८१०' विद्यार्थ्यांच्या मागील दीड ते दोन महिन्यांपासून जीवाशी खेळ सुरू ठेवला होता. बांधकाम करताना किंवा दुरुस्ती करताना सुरक्षाविषयक आवश्यक काळजी घ्ोतली जात नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. त्यामुळे महापालिका स्थापत्य विभागाच्या या गलथान कारभार विरोधात मनसे मैदानात उतरली आहे. विना कार्यादेश शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत काम  करणाऱ्या कंत्राटदारावर आणि महापालिका अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'चे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे आणि मनसे शहर सचिव विलास घोणे यांनी निवेदनातून महापालिका आयुक्त तसेच विभाग अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच संबंधितांवर कारवाई न केल्यास महापालिका प्रशासन विरोधात ‘मनसे स्टाईल'ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ‘मनसे'ने इशारा देताच महापालिका प्रशासन ताळ्यावर आले असून, कार्यादेश देईपर्यंत सदर शाळेचे काम स्थगित ठेवले आहे, अशी माहिती महापालिका तुर्भे विभागाचे उप अभियंता यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील १० हेक्टर पाणथळ क्षेत्र लुप्त; पर्यावरणवाद्यांना भिती