खारघर मधील १० हेक्टर पाणथळ क्षेत्र लुप्त; पर्यावरणवाद्यांना भिती

 ‘सिडको'तर्फे पाणथळ क्षेत्रात भराव

नवी मुंबई ः राष्ट्रीय पाणथळ क्षेत्राच्या नकाशावर सुचीबध्द झालेले खारघर मधील १० हेक्टर बारमाही पाणथळ क्षेत्र ‘सिडको'कडून सुरु असलेल्या भरावांमुळे लुप्त होत चालल्याची तक्रार पर्यावरणवाद्यांनी केली आहे. दरम्यान, सदर जागा खारघर, सेवटर-३६ मधील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटी पासून हाकेच्या अंतरावर आहे. प्रचंड मोठे पाणथळ क्षेत्र, खुटूकबंधन यावर भराव घालण्याविरुध्द जरी पर्यावरणवाद्यांनी कितीही आकांत केला तरी ‘सिडको'कडून  बाबत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची बाब ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'तर्फे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या वेगवेगळ्या ई-मेल द्वारे निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात ‘नॅटकनेवट'ने उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पाणथळ क्षेत्र तक्रार निवारण समितीला देखील तक्रार केली आहे.

सिडको २६ टवव्ोÀ भागीदार असलेल्या ‘नवी मुंबई सेझ'ने उरणमधल्या भेंडखळ पाणथळ क्षेत्राला संपूर्ण भराव घालून नष्ट केल्याच्या तसेच ‘जेएनपीटी'ला दिलेल्या बेलपाडा पाणथळ क्षेत्रामध्ये काही प्रमाणात भराव टाकण्याच्या
पार्श्वभूमीवर घटना घडत आहेत. असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

रायगड जिल्हाधिकारी यांनी तयार केलेल्या सुचीत खुटूकबंधन पाणथळ क्षेत्रांचा उल्लेख केला गेल्याची बाब अतिशय महत्वाची आहे. या पाणथळ क्षेत्राला १३३२७ कोड नंबर देण्यात आला असला तरी ‘सिडको'ने या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला आहे, असे बी. एन. कुमार म्हणाले. २०११मध्ये पाणथळ क्षेत्राच्या जवळपास एक चतुर्थांश क्षेत्रात भराव घालण्यात आला असून ‘सिडको'ने तिथे व्हॅलीशिल्प गृहनिर्माण सोसायटी प्रकल्प उभारला आहे, असे पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. सदर पावसाळी पाणथळ क्षेत्र नाही, आम्ही इथे बारा महिने पाणी पाहत आहोत, असे ‘खारघर हिल ॲन्ड वेटलँड'चे नरेशचंद्र सिंग म्हणाले.

ज्योती नाडकर्णी आणि नरेशचंद्र सिंग दोघ्ोही जिल्हाधिकाऱ्यांंनी नियुक्त केलेल्या समितीचे सभासद होते. या समितीने तीन वर्षांपूर्वी दस्तऐवजीकरण केले होते. त्यांच्या अहवालानुसार पाणथळ क्षेत्र नैसर्गिक (किनारपट्टी प्रदेशातील) खाडी आहे. या खाडीमधील वनस्पती पाणथळ प्रकारच्या असून यामुळे किनारपट्टीच्या भागाची धूप होण्यापासून आणि भरती तसेच वादळी प्रवाहांपासून अंतर्गत भागांचे रक्षण होते. जेव्हा वादळ थडकते, तेव्हा
जमिनीपर्यंत पाणी पोहोचण्याआधी खाडीमधून पाणी वाहून जाते. सदर अहवाल आता अधिकृत नोंदींचा एक भाग आहे.

दरम्यान, ज्योती नाडकर्णी यांनी ‘सिडको'च्या कार्यकारी अभियंत्यांना (नियोजन) भराव घालणे थांबवण्याबद्दल आणि पाणथळ क्षेत्रांच्या ॲटलास स्थितीचा आदर ठेवण्याबद्दल लिहिले आहे. परंतु, त्यांना कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.  अधिकारी आता पध्दतशीरपणे पावसाच्या पाण्याला पाणथळ क्षेत्रात जाऊ देणे थांबवत आहेत. त्यामुळे आता पाणथळ क्षेत्राचे अस्तित्व नष्ट झालेले आहे, असे यावरुन सिध्द होते. सदर भागात डोंगरांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित होते आणि अधिकाऱ्यांंनी या नैसर्गिक स्त्रोताची अक्षरशः वाट लावली असल्याचा आरोप ज्योती नाडकर्णी यांनी केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांनी सुरक्षितपणे नववर्ष साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन