सॅटेलाईट पाणथळ क्षेत्रांसंबंधित असलेल्या समस्या अजुनही कायम; पर्यावरणवाद्यांना चिंता
ठाणे खाडीमधील पलेमिंगो पक्षी अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा
नवी मुंबईः हे आता अधिकृत झाले आहे ठाणे खाडी परिसरातील वाशी आणि भांडूप या दरम्यान परसलेल्या पलेमिंगो पक्षी अभयारण्याला आंतरराष्ट्रीय पाणथळसंवर्धनाने रामसर स्थळाचा दर्जा दिला आहे. सेक्रेटरी जनरल ऑफ कन्वेशन ऑन वेटलँड जॉनथन बार्झोदो यांनी सदर प्रमाणपत्र सरकारला दिले. टीसीएफएसला रामसर स्थळ क्रमांक २४९० म्हणून
दर्जा देण्यात आला आहे. अतिरिवत प्रधान सचिव तथा स्टेट मॅनग्रुव्ह सेलचे चीफ कन्सर्वेटर ऑफ फॉरेस्ट विरेंद्र तिवारी यांनी सदर प्रमाणपत्राबद्दल २७ डिसेंबर रोजी टि्वट केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाशी आणि भांडूप मधील पलेमिंगो पक्षी अभयारण्याला रामसर स्थळ दर्जा देण्याबाबतच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मुल्यांकीत केले गेले होते. या दर्जामुळे टीसीएफएस आता आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा एक भाग बनला आहे. सदर ठिकाणी जिथे पाणथळ क्षेत्रांचे आणि त्यांच्या स्त्रोतांचे जतन आणि हुशारीने केलेला वापर यामुळे दीर्घकालीन विकासाला योगदान मिळणार आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (एमओइएफसीसी) सचिव लीना नंदन म्हणाल्या.
सदर बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. टीसीएफएस सॅटेलाईट पाणथळ क्षेत्रांचा भाग असलेल्या पाच पाणथळ क्षेत्रांकडे होणाऱ्या मोठ्या प्रमाणतील दुर्लक्षाकडे लक्ष केंद्रित करणारी तत्परता आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी.एन. कुमार यांनी सांगितले. बीएनएचएस अभ्यास तसेचटीएसएफसी व्यवस्थापन आराखड्यानुसार सॅटेलाईट पाणथळ क्षेत्रांचे हजारो स्थलांतरीत तसेच स्थानिक पक्षांसाठी असलेले स्थळ म्हणून जतन करावे आणि जैवविविधतेला राखावे, असे बी. एन. कुमार यांनी म्हटले आहे. एनआरआय पाणथळ क्षेत्र त्याच्या किनारपट्टीवर रात्रंदिवस चाललेल्या मोठ्या प्रमाणातील रियल इस्टेट मालमत्तेच्या बांधकामामुळे प्रदुषित झाले आहे, असेही नंदकुमार पवार म्हणाले.
एन्व्हायर्नमेंटल इंपॅक्ट असेसमेंट (इआयए) अभ्यासाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एनएमआयएएल) द्वारे प्रस्तुत करण्यात आले होते. त्यात देखील विमानतळावर पक्षी येणे थांबवण्यासाठी पाणथळ क्षेत्रांचे जतन करणे आवश्यक आहे अशी बीएनएचएस आणि पर्यावरणवाद्यांनी भिती व्यक्त केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, वास्तवामध्ये पक्षांच्या सदर पाणथळ स्थळांना नष्ट करण्यात आले आहे, अशी बाब बी. एन. कुमार आणि नंदकुमार पवार यांनी कंट्रोलर जनरल ऑफ ऑडिट ऑफ इंडियाला (सीएजी) केलेल्या तक्रारीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे.
वन खात्याच्या अखत्यारिमध्ये असलेल्या ‘मॅनग्रुव्ह सेल'ने स्वतः सॅटेलाईट पाणथळ क्षेत्र आराखडा तयार केला होता. मॅनग्रुव्ह सेल नवी मुंबईमध्ये पाच पाणथळांचे अस्तित्व नाकारणाऱ्या ‘सिडको'ला एक चपराक आहे. बेलपाडा, भेंडखळ, पाणजे, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ क्षेत्रांचे जतन करण्यासाठी (मुंबईतील भांडूप व्यक्तिरिक्त) मॅनग्रुव्ह सेल तयार आहे. परंतु, ‘सिडको'ने जतन करण्यासाठी सदर पाणथळ क्षेत्रे सुपूर्द करण्यास नकार दिला असल्याचे ‘नॅटकनेवट'तर्फे संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. -बी.एन.कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.
दुसरीकडे याच्या उलट परिस्थिती असून बेलपाडा पाणथळ क्षेत्रामध्ये ‘जेएनपीटी'ने भराव घातला आहे. भेंडखळ पाणथळ क्षेत्र ‘नवी मुंबई सेझ'च्या भरावामुळे पूर्णपणे नाहिसे झाले आहे. पाणजे पाणथळ क्षेत्र अंतर्गत भरती प्रवाहाला थांबवल्यामुळे शुष्क पडत चालले आहे. -नंदकुमार पवार, अध्यक्ष-सागर शक्ती समुद्री विभाग.