प्रशिक्षण शिबीरामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत -सुरेश मेंगडे

‘सिडको'तील प्रकल्पग्रस्त कर्मचारी-अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

नवी मुंबई ः ‘सिडको'तील प्रकल्पग्रस्त कर्मचारी तसेच अधिकारी यांच्याकरिता ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'च्या वतीने पनवेल मधील विसावा रिसॉर्ट येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सुमारे २०० पेक्षा जास्त प्रकल्पग्रस्त कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमाचे उद्‌घाटन ‘सिडको'चे व्यवस्थापक (कार्मिक) फैय्याज खान यांनी केले. ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, कार्मिक अधिकारी विशाल ढगे यांनी प्रशिक्षण शिबीरास अखेरपर्यंत उपस्थिती दर्शवून कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले. याप्रसंगी ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील, माजी अध्यक्ष निलेश तांडेल, रोहिदास मुंबईकर, ॲड. सुरेश ठाकूर, ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जे. टी. पाटील, उपाध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी अशा प्रशिक्षण शिबीरामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता निश्चित वाढण्यास मदत होईल. तसेच संत साहित्यातील उत्तम उदाहरणे देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. तर अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर दरवर्षी घ्ोण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करेल, असे व्यवस्थापक फैय्याज खान यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासित केले.

या प्रशिक्षण शिबिरात ‘सिडको'च्या दक्षता विभागातील सल्लागार मोहन गवस यांनी कर्मचाऱ्यांची नैतिकता, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. संदीप सावंत यांनी कार्यालयीन ताणतणाव आणि नियोजन याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. तसेच प्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांनी आरोग्य विषयी उपयुक्त माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांंना दिली. तसेच त्यांनी छोट्या-छोट्या आजारांवर घरगुती उपचार पध्दती सोप्या भाषेत समजावून सांगितले.

दरम्यान, सदर प्रशिक्षण शिबीराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करुन प्रशिक्षण शिबीरासाठी सहकार्य केल्याबद्दल सिडको व्यवस्थापनाचे आणि उपस्थित कर्मचारी-अधिकारी यांचे ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जे. टी. पाटील यांनी आभार मानले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या संबंधित अभियंत्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी