शेकडो मुलांना पारंपारिक बैठ्या, मैदानी खेळांचे मार्गदर्शन

आपला कट्टा संस्थेच्या चला खेळ खेळूया कार्यशाळेत शेकडो मुलांचा उत्स्फुर्त सहभाग  

 

नवी मुंबई ः ऐरोलीतील ‘आपला कट्टा संस्था'च्या वतीने ‘चला खेळ खेळूया...' या उपक्रमाच्या माध्यमातून पुरातन पारंपारिक बैठ्या आणि मैदानी खेळांची कार्यशाळा २५ डिसेंबर रोजी ऐरोलीतील स्व.भास्कर घाडी मैदान येथे संपन्न झाली. या एक दिवसीय कार्यशाळेत पारंपारिक बैठ्या आणि मैदानी खेळासह मुलांचा मानसिक तसेच शारीरिक विकास कसा करता येईल या समुपेदशन सत्रामध्ये ममता भोसले आणि डॉ.अरुण औटी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.


सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात आट्या-पाट्या, भवरे, गोट्या, विटी दांडू यासारख्या १० ते १५ विविध मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या सत्रात एकाग्रता, नियोजन कौशल्य आणि स्मरणशक्ती वृध्दींगत होण्यासाठी मंकला, वाघ बकरी, अडुहुली, पच्चीसी, मोक्षपट यासारख्या अनेक बैठ्या खेळांचा सराव घेण्यात आला. मुलांसोबत पालकांना देखील मन, बुध्दी आणि शरीर या समुपदेशन सत्राद्वारे सदर खेळांचे महत्त्व विषद करण्यात आले. ममता भोसले आणि डॉ. अरुण औटी यांच्याद्वारे मुलांच्या सर्वांगिण, मानसिक
आणि शारीरिक विकासाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन ‘कोकण इतिहास परिषद'चे अध्यक्ष सदानंद टेटविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुप्रस्धिद कवि अरुण म्हात्रे  यांच्यासह ‘आपला कट्टा संस्था'चे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी पुणे, मुंबई आणि इतर
उपनगरातून १५० हुन अधिक मुलांनी सहभाग घेतला होता.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मार्फत  दिवाळेगांव मासळी मार्केट मधील कचरा विल्हेवाटीचा देशातील पहिलाच प्रकल्प