‘सिडको'च्या ‘महागृहनिर्माण योजना'ची १९ जानेवारी संगणकीय सोडत
नवी मुंबई ः ‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ या गृहनिर्माण योजनेला मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या मागणीमुळे सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘सिडको'ने घेतला आहे. या योजनेकरिता अर्ज नोंदणी करण्यास २२ डिसेंबर २०२२ अशी अंतिम तारीख होती. या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये ७,८४९ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी करिता ऑनलाइन अर्ज नोंदणी ६ जानेवारी पर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज ७ जानेवारी पर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२३ आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी १२ जानेवारी २०२३ रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १६ जानेवारी २०२३ रोजी ‘सिडको'च्या प्ूूज्ेः//त्दूूीब्.म्ग्म्दग्ह्ग्ी.म्दस्/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकानुसार योजनेची संगणकीय सोडत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या ऐवजी ती १९ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे, असे ‘सिडको'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.