पर्यावरणवाद्यांचा संताप
पारसिक हिलच्या खोदकाम परिसरात काँक्रीट प्रकल्प
नवी मुंबई ः पारसिक हिलच्या खोदकाम क्षेत्रात रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पाच्या उभारणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वास्तविक पााहता पर्यावरणवाद्यांच्या मते अशाप्रकारच्या कामाला वन क्षेत्रांमध्ये परवानगी दिली जात नाही. वन खात्याने ‘सिडको'ला पारसिक हिलचे १३८ हेक्टरांहून जास्त क्षेत्र खोदकामासाठी तसेच नवी मुंबईच्या विकासासाठी ५० वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनींच्या मोबदल्यामध्ये प्रकल्पबाधित लोकांना पुन्हा स्थापित करण्यासाठी दिले आहे.
१०२ खोदकामांच्या ठिकाणची यंत्रे शांत झाल्यामुळे एमजी नगर, नेरुळ येथे खोदकाम स्थळावरील आरएमसी प्रकल्पाने पर्यावरणवाद्यांचे लक्ष वेधले आहे, असे ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी.एन.कुमार यांनी सांगितले. सदरचा प्रकार अतिशय गंभीर बाब संबोधत बी. एन. कुमार यांनी वन खात्याला या आरएमसी प्लांटसाठी कशी काय परवानगी मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पक्क्या काँक्रीट संरचनेच्या बांधकामात लक्ष घालण्याची तसेच खोदकामाच्या सर्व स्थळांच्या ठिकाणी आणखीन काही उल्लंघने झाली आहेत का? ते तपासण्यासाठी सर्वेक्षण देखील करण्याची विनंती केली आहे.
पर्यावरणवाद्यांनी देखील आरएमसी प्रकल्प खोदकामाची नांदी आहे का? अशी शंका व्यक्त केली आहे. खोदकामाला नवी मुंबई महापालिका सह बऱ्याच जणांनी कडाडून विरोध केला आहे. नवी मुंबई महापालिकेने तर सदर प्रकरणावर एनजीटीमध्ये पाच वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले होते. -बी. एन. कुमार, संचालक - नॅटकनेवट फाऊंडेशन.
सदर सर्व निरर्थक आहे. असे ‘श्री एकवीरा आई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले. आम्ही ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'च्या सहयोगाने शहराला प्रदुषित करणाऱ्या खोदकामाविरुध्द सेव्ह पारसिक हिल्स अभियान सुरु केले आहे. खोदकामाला परवानगी देताना येथे इतर कोणतेही काम हाती घेता कामा नये याबाबत वन विभागाने स्पष्ट आदेश दिला होता. दिवसाढवळ्या सुरु असलेला सदर प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास न आल्याबद्दल त्यांच्या तीबद्दल आश्चर्य वाटते. - नंदकुमार पवार, अध्यक्ष-श्री एकवीरा आई प्रतिष्ठान.
वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे डोंगर दुर्बल होत चालले आहेत. या पट्ट्यामधल्या जैवविविधतेचे आणि पर्यावरणाचे देखील बरेच नुकसान झाले आहे. ज्या कुणी आरएमसी प्लांटला आणि इतर खोदाकामांना परवानगी दिली आहे, ती व्यक्ती निसर्गाशी खेळत आहे. - विष्णू जोशी, पदाधिकारी-पारसिक ग्रीन्स फोरम.