जयपूर फूट शिबीर उत्साहात संपन्न

१०२ दिव्यांगांना मिळाला जयपूर फूटचा आधार

पनवेल: जनसेवेचा वसा असाच कायम सुरूच ठेवणार असून सामान्य परिवाराला सन्मानाने जीवन जगता आल पाहिजे या भावनेतून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट बसविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट संदर्भात ऑक्टोबर महिन्यात शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हात, पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून कृत्रिम हात, पायासाठी मापे घेण्यात आली होती. त्यानुसार पुढील प्रक्रिया होऊन कृत्रिम अवयव तयार झाले. ते कृत्रिम अवयव आज या उपक्रमात १०२ व्यक्तींना बसविण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिव्यांग व्यक्तींची आवर्जून चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. 

         पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, डॉ.  संतोष आगलावे, डॉ.  सचिन जाधव, साधू वासवानी मिशनचे मार्केटिंग हेड डॉ. मिलींद जाधव, डॉ. सलील जैन, डॉ. सुशील ढगे, चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ पाटील, शिवाजी दुर्गे, संजय जाधव, ज्ञानेश्वर पाटील, मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी आदी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोलीतील फ्लेमिंगो बोट सफर सुरू