विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कायदेविषयक जनजागृती या विषयावर मार्गदर्शन

अडवली-भुतावली शाळेत कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई ः विद्या प्रसारक मंडळ, ठाणे नगरपालिका विधी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महापालिका अडवली-भुतावली शाळेतील इयत्ता ७ वी, ८ वी , ९वी च्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सर्व शिक्षकांना कायदेविषयक जनजागृती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वकिलांनी उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले. सदर कार्यक्रमात सायबर लॉ, आपली मूलभूत कर्तव्ये आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या, पोक्सो कायदा, मूलभूत हक्क, लोक अदालत, १४ वर्षाखालील बालकांना सक्तीचा-मोफत शिक्षणाचा अधिकार, खाजगी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २५ टवव्ोÀ आरक्षण, ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणूक, वकिली व्यवसायाचे महत्व या विषयांवर विनोद नवले, स्वप्नाली चव्हाण, ओमकार अय्यर, रोहिणी साठे, अनिमेश कुमार, स्वेता पाटील, दशरथ गंगावणे, सागर सुरवसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी अडवली-भुतावली शाळेची निवड करणारे  पोलीस अंमलदार शिवा ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोगी पडेल अशा मार्गदर्शक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्याला शाळेचे  मुख्याध्यापक सावंत यांनी होकार दर्शविल्यानंतर सदर कार्यक्रम शाळेतील शिक्षकांच्या मदतीने खूप चांगल्या पध्दतीने संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक सावंत यांनी मार्गदर्शक वकील आणि त्यांच्या टीमचे शाळेच्या वतीने आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मच्छीमारांचा विरोध