‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ ऑनलाइन अर्ज नोंदणी मुदतवाढ

 ‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळी करिता अर्ज नोंदणीस मुदतवाढ

नवी मुंबई ः ‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या मागणीमुळे सदर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यास ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘सिडको'ने घेतला आहे. या योजनेकरिता अर्ज नोंदणी करण्यासाटी २२ डिसेंबर पर्यंत अंतिम तारीख होती. परंतु, अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता येणे शक्य होऊन, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘सिडको'तर्फे घेण्यात आला आहे. या अनुषंगाने अनामत रक्कम आणि शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.  

‘सिडको'ेतर्फे या वर्षीच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर २४ ऑक्टोबर २०२२ रोजी महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ अंतर्गत नवी मुंबईच्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व २ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व २पी येथे ७,८४९ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या योजनेद्वारे झपाट्याने विकसित होत असलेल्या आणि परिवहनदृष्ट्या समृध्द उलवे नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील घर घ्ोण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी ६ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज ७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाईन शुल्क भरणा ७ जानेवारी २०२३ पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी १४ जानेवारी २०२३ रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ जानेवारी २०२३ रोजी ‘सिडको'च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.  
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश