बेलापुर किल्ला संवर्धन कामात नेमका भ्रष्टाचार कोणी केला ?

नवी मुंबई -:सिडको मार्फत बेलापुर  किल्ला संवर्धनाचे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आले होते.आणि हे काम चुकीचे असल्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी केली होती.आणि या मागणीला यश आले असून सिडकोने कंत्राट दार आणि सल्लागार या दोघांना एकूण १५,८७,८५० रुपयांचा दंड  ठोठावला आहे.

बेलापुर किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामासाठी सिडकोकडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदार व सल्लागार यांनी एकमताने किल्ल्यामध्ये केलेले काम हे पुरत्वाव खात्याला विश्वासात न धरता चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याबाबत राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष नितिन चव्हाण यांनी सिडको व पुरातत्व विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार करून तसेच सिडको विरोधात आंदोलन करून चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले हे काम थांबवले होते. हे काम थांबवल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी युवक काँग्रेसवर आणि इतर संघटनांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून कामगारांना मारहाण केल्याचे देखील आरोप केले होते. मात्र नितिन चव्हाण यांनी केलेले आरोप हे अखेर सिडकोने मान्य करत या किल्ल्यात चुकीचे काम झाल्याप्रकरणी कंत्राटदार सवानी हेरिटेज व सल्लागार किमया आर्किटेक्ट यांवर तब्बल १५,८७,८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे किल्ला संवर्धन कामात नेमका भ्रष्टाचार कोणी केला? आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनी  केला की राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला?  हे आता आरोप करणाऱ्या राजकीय नेत्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी  नितीन चव्हाण यांनी या निमित्ताने केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७५ विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तुंंची दुकाने लावून विक्री