आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली व आगरी गुणगौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वधु-वर परिचय मेळावा

सामुदायिक विवाहच्या  निमित्ताने २४ आणि २७ डिसेंबरला आगरी वधुवर परिचय मेळावा

नवी मुंबई -: आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली व आगरी गुणगौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाजात सामुदायिक विवाहची संकल्पना पुढे आणली आहे.आणि.त्यासाठी  अगोदर आगरी वधु वर परिचय  मेळावा आयोजित केला जातो.यंदा २४ आणि.२७ डिसेंबर रोजी डोंबिवली आणि दिव्यामध्ये हा आगरी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि परिवारांचे मिलन.मात्र हेच लग्न आजच्या महागाईच्या जमान्यात  सर्वांनाच परवडत नाही.त्यामुळे काही जण कोर्ट मॅरेज तर काही जण वैधिक  पद्धतीने लग्न करतात.मात्र आगरी समाजात क्वचितच अशा पध्दतीने लग्न केले जातात.त्यामुळे

आगरी समाजात लग्न सराईला मोठा खर्च होत असतो.मात्र आजच्या महागाईच्या जमान्यात हा खर्च करताना कधी कधी कर्ज घ्यावे लागते.त्यामुळे असा खर्च कमी करण्याहेतू व आपल्या संस्कृतीनुसार रीतभर पाळून सामुदायिक विवाहचा एक विकल्प समोर येत आहे. आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली व आगरी गुणगौरव समिती  यांनी यासाठी पुढाकार घेतला असून सामुदायिक विवाह पार पाडले जात आहेत.त्यासाठी अगोदर वधुवर मेळावा आयोजित करून इच्छुकांची लग्नगाठ बांधली जाते.वरील संस्थेच्या माध्यमातून आगामी मे महिन्यात सामुदायिक विवाहाचे नियोजन आहे.आणि.त्यासाठी२४ आणि.२७ डिसेंबर रोजी डोंबिवली आणि दातिवली दिव्या मध्ये या आगरी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर,ठाणे,रायगड आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगरी समाज आहे.त्यामुळे येथील आगरी समाजातील लग्न करू पाहणाऱ्या तरुण तरुणींनी या वधु वर परिचय मेळाव्यात सहभाग घेत  योग्य जोडीदारासोबत आपली लग्नगाठ बांधावी असे  आवाहन  समाजसेविका अंजलीताई भोईर यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापुर किल्ला संवर्धन कामात नेमका भ्रष्टाचार कोणी केला ?