पनवेल रेल्वे स्थानकाजवळ खड्डयातील पाण्यामध्ये 3वर्षे चिमुकलीचा बुडून मृत्यू

रेल्वेच्या खड्डयात पडुन 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू  

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयातील पाण्यामध्ये पडलेल्या माही सिद्धेश्वर वाघमारे (3वर्षे) या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील कार्यवाही सुरु केली असली तरी या घटनेनंतर स्थानिकांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आहे. तसेच या खड्डÎांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांकडुन करण्यात येत आहे.  

नवीन पनवेल मधील पंचशील नगर लगत रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू असून त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्डयामध्ये पाणी साचले असून या खड्डयाजवळ बुधवारी दुपारी जवळच असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीत राहणारी चिमुकली माही वाघमारे ही खेळत खेळत गेली होती. मात्र चुकून ती या खड्डयातील पाण्यात पडली. हा प्रकार काही प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर खड्डयातील पाण्यात पडलेल्या माहीला बाहेर काढुन तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेची पनवेल रेल्वे पोलिसांनी नोंद घेऊन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.  

दरम्यान, ज्या ठिकाणी माहीचा खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू झाला, त्या ठिकाणी रेल्वेच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले असुन या खड्डयांमध्ये अनेक महिन्यांपासून पाणी साचलेले आहे. संबधीत ठेकेदारांकडून त्याठिकाणी सुरक्षा बाळगण्यात न आल्याने तसेच प्रशासनाने देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने तेथील खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून लहानग्या माहीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी देखील येथील खडÎात पडून लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, मात्र त्यानंतर देखील हे खड्डे बुजवण्यात आले नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खड्डÎांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांकडुन करण्यात येत आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली व आगरी गुणगौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वधु-वर परिचय मेळावा