किसान कृषी प्रदर्शन 2022 प्रदर्शनात पाणी नियोजनाचं तंत्रज्ञान मुख्य आकर्षण
भारतातील सर्वात मोठ्या ‘किसान' कृषी प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद
पुणे ः किसान कृषी प्रदर्शन 2022 भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन (Kisan Krushi Exhibition 2022) हे १४ ते १८ डिसेंबर रोजी पुण्यातील भोसरी जवळील मोशी येथे नुकतेच पार पडल. यात शेतकऱ्यांचा मेळा बघायला मिळाला, या प्रदर्शनाची सांगता रविवारी मोठ्या उत्साहात झाली. या प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना येथे शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान पाहता आले व अनुभव घ्ोता आला. कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता.
पंधरा एकर परिसरात भरलेल्या या कृषी प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले. देशभरातील अंदाजे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यंदा कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, पशुधन जैव, ऊर्जा, रोपवाटिका आणि शेती लघु उद्योग तसेच पीकांवर व्ोÀलेली प्रक्रीया त्यातून निर्माण होणारी नवनवीन उत्पादने अशी विभागवार दालने सजली होती. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल स्वरुपात आकर्षक रचना करण्यात आली होती.
दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
या किसान वृÀषी प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं सादर करणार आली होती. प्रदर्शनात ५ दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता. किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग आणि सहकार्य लाभले होते.
पाणी नियोजनाचं तंत्रज्ञान मुख्य आकर्षण
पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान तसेच त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन देणाऱ्या ८० हून अधिक कंपन्यांचा सहभाग या किसान प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग होता. मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. यामुळेच उद्योजक यांचे नवनवीन विचार आणि उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास सोईस्कर झाले. यातील उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे उत्पादन मुब्य, जैव तंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घ्ोऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती शेतकऱ्यांना मोठया स्वरुपात मिळाल्याचे काहीजणांनी बोलून दाखवले.