हर घर शौचालय योजना पूर्ती'साठी झोपडपट्टी मध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची मागणी

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर झोपडपट्टी परिसरात हर घर शौचालय अभियानाच्या पूर्ततेसाठी नवी मुंबई महापालिकेने  झोपडपट्टी परिसरात मलनिस्सारण वाहिन्या  टाक्याव्यात, अशी मागणी "फकिरा पँथर सामाजिक संघटना'चे संस्थापक - अध्यक्ष अँड. गुरु सुर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तुर्भे स्टोअर झोपडपट्टी परिसरात  ७० हजार लोकसंख्या असून, २० सार्वजनिक शौचालयांची निर्मिती नवी मुंबई महापालिका मार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालय वरती अतिरक्त ताण भार पडत असून, रोगराईचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका मार्फत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्यानंतर नागरिकांना सोयीनुसार शौचालय निर्मिती करता येणार असून, स्वच्छता अभियानाचा उद्देश साध्य होऊन रोगराईचे प्रमाण नियंत्रणात येणार आहे, असे गुरु सुर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

 सीबीडी येथील रमाबाई नगर मध्ये येथे नवी मुंबई महापालिका मार्फत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत त्यामुळे सदर विभागात बहुतांश घरामध्ये शौचालय आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयावरील ताण कमी होत आहे.त्याच पद्धतीने नवी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी  म्हणून प्रसिद्ध तुर्भे स्टोअरमध्ये मलनिस्सारण वाहिन्या नवी मुंबई महापालिकेने टाकण्याची तसेच त्याकरिता आवश्यक नियोजन युध्द पातळीवर करण्याची गरज आहे. - अँड.- गुरू सुर्यवंशी - संस्थापक - अध्यक्ष, "फकिरा पँथर, नवी मुंबई.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधासाठी विभागवार मोहीम