रॅडक्लिफ आंतर-शालेय तायक्वांदो स्पर्धेत नमुंमपा सी बी एस ई शाळा क्र.९४ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

नवी मुंबई : रॅडक्लिफ ग्रुप ऑफ स्कूल अंतर्गत रॅडक्लीफ स्कुल, खारघर येथे शनिवार दि. १७/१२/२०२२ रोजी रॅडक्लिफ आंतर-शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२२-२३ उत्साहात पार पडली. ह्या स्पर्धेत नवी मुंबई व रायगड येथील विविध वयोगटातील सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 

सदर स्पर्धेमध्ये नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ९४, कोपरखैरणे (सीबीएसई)चे १३ विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील तनिष्क किरण दाणे (२० किलोखालील), अथर्व रामदास साळुंखे (२४ किलोखालील) व नूर सय्यद इद्रीशी (३२ किलोखालील) यांनी वैयक्तिक फाईट प्रकारात ३ रौप्य पदके पटकावली. तर स्वरुप नितीन गोळे, रितेश चंगु बारागडे, मनीष रवी शिरसाट, विवेक विनोद सुरवाडे व हसन ताहिर मनसुरी यांनी ५ कांस्यपदके मिळवली. 

विशेष बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी तायक्वांदो स्पर्धेत प्रथमच सहभागी झाले होते. ह्या विद्यार्थ्यांना गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी मार्फत मुख्य प्रशिक्षक रोहित तानाजी सिनलकर (३ डॅन ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच) व सहप्रशिक्षक ओंकार रमेश गिरे (१ डॅन ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच) यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते. शाळेचे मुख्याध्यापक  मारुती गवळी सर, सह शिक्षक आशिष रंगारी, प्रमोद बामले, कविता वाडे यांनी सर्व यशस्वी मुलांचे अभिनंदन केले व मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर यशाबद्दल या यशस्वी मुलांचे शालेय परिसरात पालक विद्यार्थी यांचे मार्फत कौतुक केले जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हर घर शौचालय योजना पूर्ती'साठी झोपडपट्टी मध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची मागणी