महापे शीळ रस्ता लवकरच  उजळणार

नवी मुंबई -:नवी मुंबई महापालिकेच्या  वतीने महापे शीळ या रस्त्यावर पथदिवे  बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ७५ ते८० दिवे बसवले जाणार आहेत. त्यामुळे इतके दिवस अंधारात असलेला हा रस्ता लवकरच उजळणार आहे. या रस्त्यावर पथदिवे बसवावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून  करण्यात आली होती.

महापे औद्योगिक वसाहतीत  कल्याण डोंबिवली,मुंब्रा आदी भागांतून रोज हजारो कामगार रोजगारासाठी येत असतात.आणि या वसाहतीत ये जा करण्यासाठी महापे शीळ मार्ग हा महत्वाचा दुवा आहे.मात्र या रस्त्यावर मागील काही वर्षापासून दिवाबत्तीची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करावा लागत असे.त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहन चालकांना अडचणी येत असत. तर महिला वर्गात प्रवासादरम्यान भीतीचे वातावरण असायचे. त्यामुळे येथे दिवाबत्तीची सोय करावी अशी मागणी जोर धरू लागली होती.आणि या मागणी नुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्यावर नवीन दिवाबत्ती बसवण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता  उजळणार आहे. सदर मार्गावर दोन टप्प्यांत पथदिवे बसवले जाणार असून   पहिल्या ७५ ते ८० पथदिवे असणार असतील आणि त्यासाठी ५२ लाख रु. खर्च येणार आहे.त्यामुळे येत्या महिनाभरात हे काम पूर्ण  होईल अशी माहिती मनपा विद्युत परिमंडळ दोन चे उप अभियंता तानाजी शिंदे यांनी दिली .

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हल्लेखोरांना अटक न केल्यास  बेमुदत काम बंद आंदोलन करणार